सहाय्यक आयुक्त दायमा निवृत्त

By Admin | Updated: February 4, 2017 03:43 IST2017-02-04T03:43:38+5:302017-02-04T03:43:38+5:30

सहाय्यक पोलीस आयुक्त धनराज दायमा सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी किरण पाटील यांची नियुक्त करण्यात आली आहे. आपल्या कार्यकाळात दायमा

Assistant Commissioner, Dyma retired | सहाय्यक आयुक्त दायमा निवृत्त

सहाय्यक आयुक्त दायमा निवृत्त

नवी मुंबई : सहाय्यक पोलीस आयुक्त धनराज दायमा सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी किरण पाटील यांची नियुक्त करण्यात आली आहे. आपल्या कार्यकाळात दायमा यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यावर अधिकाधिक जोर दिला होता.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात परिमंडळ १ मध्ये सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असलेले धनराज दायमा मंगळवारी सेवेतून निवृत्त झाले. यामुळे रिक्त झालेल्या त्यांच्या जागी किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दायमा यांनी नाशिक येथून नवी मुंबईत पदभार स्वीकारल्यापासून कायदा व सुव्यवस्था राखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना शिस्तीचे धडे देण्यासह गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याच्या कामात बळ देण्याचेही काम त्यांनी केले. तर तणावाच्या प्रसंगी देखील त्यांच्याकडून योग्यरीत्या परिस्थिती हाताळली गेलेली आहे. यामुळे अनेक गंभीर गुन्ह्यांची वेळेवर उकल होवून दोषींवर कारवाई होण्यास पोलिसांना मदत झालेली आहे. त्याशिवाय पोलीस व सर्वसामान्य नागरिक यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करून गुन्हा घडण्यापूर्वीच तो कसा टाळता येईल यासाठीही त्यांच्याकडून प्रयत्न झालेले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Assistant Commissioner, Dyma retired