शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्तांना मदत ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’ची, हजारोंना मिळाली वेळेत मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 02:51 IST

देशभरात रस्ते अपघातांच्या संख्या वाढली आहे. दररोज कुठेना कुठे अपघात होत असून अनेकांना जीव गमवावे लागत आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. अपघातानंतर त्वरित मदन न मिळाल्यानेही अनेकांचे प्राण गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

पनवेल : देशभरात रस्ते अपघातांच्या संख्या वाढली आहे. दररोज कुठेना कुठे अपघात होत असून अनेकांना जीव गमवावे लागत आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. अपघातानंतर त्वरित मदन न मिळाल्यानेही अनेकांचे प्राण गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, यासाठी रायगड जिल्ह्यातील ‘अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी’ ही सामाजिक संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहे. संस्थेने एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सुरू करून रायगड, मुंबई, पुणे, नाशिक जिल्ह्यातील हजारो अपघातग्रस्तांना मदतीचा हात दिला जात आहे.‘अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी’ या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ रामचंद्र साठेलकर यांनी पत्नी श्रद्धा आणि मुली पूजा व भक्ती यांच्या सहकार्याने ही संस्था सुरु केली आहे. अपघाताच्या घटनांची माहिती मिळण्यासाठी साठेलकर यांनी २०१५ मध्ये हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सुरू केला आहे. या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये २५० पेक्षा जास्त सदस्य आहेत. या सदस्यांमध्ये डॉक्टर, रुग्णवाहिका चालक, पोलीस, महसूल अधिकारी, सर्पमित्र, विविध सामाजिक क्षेत्रांतील प्रतिनिधी आदींचा समावेश आहे. विविध क्षेत्रांत घडणाऱ्या अपघातांची माहिती तत्काळ मिळाल्यावर या ग्रुपद्वारे अपघातग्रस्तांना मदतीसाठी सूत्रे हालविली जातात. ग्रुपचे संस्थापक साठेलकर यांच्या संपर्कात एकूण आठ रुग्णवाहिकेचे वाहन चालक आहेत. आजवर पाच हजारापेक्षा जास्त अपघाताची माहिती या ग्रुपवर आजवर मिळाली आहे.त्यामध्ये एक हजारपेक्षा जास्त अपघातग्रस्तांचे जीव या ग्रुपच्या माध्यमातून वाचविण्यात आले आहेत. २००० पेक्षा जास्त अपघातग्रस्त मृतदेह स्वत: या टीमच्या सदस्यांनी घटनास्थळावरून बाहेर काढले आहेत. प्रत्येक महिन्याला साधारण १०० पेक्षा जास्त साप पकडले जातात. विविध संस्थांशी संलग्न राहून ही संस्था सतत अपघातग्रस्तांना मदतीसाठी तत्पर असते. साठेलकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना रायगड जिल्हा परिषदेने रायगड भूषण पुरस्कार देऊन गौरविले आहे.मागील महिन्यात २७ आॅक्टोबर रोजी अपघातग्रस्तांना मदत करताना स्वत: गुरुनाथ साठेलकर यांना हृदयविकाराचा झटका आला. या अपघातात तीन जणांना जीव गमवावा लागला होता. संबंधित मृतदेह बाहेर काढण्यासाठी राबविण्यात आलेल्या मदतकार्याच्यावेळी हि घटना घडली होती.जुन्या मुंबई पुणे महामार्गावर २३ आॅक्टोबर रोजी युक्रेन देशातील परदेशी नागरिकांचे खोपोलीजवळ दुचाकीवरून जात असताना रिक्षाच्या धडकेने अपघात झाले. या घटनेची माहिती मिळताच या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर घटनेचे छायाचित्र पडताच. ग्रुपमार्फत त्वरित अपघातग्रस्तांना मदतीसाठी सदस्य रवाना झाले. या परदेशी नागरिकांना त्वरित प्रथमोपचार देण्यात आले, किरकोळ जखमी झालेले हे परदेशी नागरिकदेखील पुढील प्रवासासाठी रवाना झाले.अपघात घडल्यावर अनेक जखमींना मदत मिळत नसल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागतो. अपघातग्रस्तांना तत्पर मदत मिळाल्यास अनेकांचे जीव वाचू शकतील, याकरिता हा उपक्रम राबवत व्हॉसट्अ‍ॅप ग्रुप तयार केला. घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी हाच आमचे उद्देश आहे. आजवर हजारो जणांना आम्ही मदतीचा हात दिला आहे.- गुरुनाथ साठेलकर,संस्थापक अध्यक्ष, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपAccidentअपघात