Ashwini Bidre's hearing adjourned hearing, accused's lawyer absent | अश्विनी बिद्रे हत्येप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली, आरोपींचे वकील गैरहजर
अश्विनी बिद्रे हत्येप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली, आरोपींचे वकील गैरहजर

पनवेल : अश्विनी बिद्रे हत्याकांडाची सुनावणी शुक्रवारी पनवेल सत्र न्यायालयात घेण्यात आली. मात्र, आरोपींचे वकील विकास भानुशाली गैरहजर असल्याने न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती राजेश अस्मर यांच्या न्यायालयासमोर सुनावणी पार पडली.

आरोपीमार्फत पुढील सुनावणीची तारीख मागण्यात आली असता, सरकारी वकील प्रदीप घरत यांनी बचाव पक्षाच्या मागणीला आक्षेप घेत सदर प्रकरणातील साक्षीदार आश्विनी बिद्रे यांचा भाऊ आनंद बिद्रे हा साक्ष देण्यासाठी चेन्नईवरून येत असल्याने त्यांचा वेळ व पैसा खर्च होत असल्याचे न्यायालयाला सांगितले. या वेळी न्यायमूर्ती अस्मान यांचा न्यायालयाने दंड व भत्ता म्हणून आठ हजार रुपये आनंद यांना देण्याचे तत्काळ आदेश दिले व पुढील सुनावणी १९ डिसेंबर रोजी ठेवली.

या सुनावणीदरम्यान सहायक पोलीस आयुक्त संगीता शिंदे अल्फान्सो व अजय कदम हे उपस्थित होते. तसेच मुख्य आरोपी अभय कुरुंदकर, महेश फळणीकर, राजेश पाटील, कुंदन भंडारी हे चारही जण सुनावणीस उपस्थित होते.

Web Title: Ashwini Bidre's hearing adjourned hearing, accused's lawyer absent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.