कारमालकांची फसवणूक करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:59 IST2019-03-01T23:59:23+5:302019-03-01T23:59:28+5:30

तळोजामधील पेठाली गावातील मनोज पाटील हे गाड्या भाड्याने घेऊन कंपनीमध्ये लावण्याचे काम करत.

The arrest of the caramel cheater | कारमालकांची फसवणूक करणाऱ्यास अटक

कारमालकांची फसवणूक करणाऱ्यास अटक

पनवेल : गाड्या भाड्याने लावण्यावरून गाडीमालकाची फसवणूक करणाऱ्या एकाला तळोजा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून विविध कंपन्याच्या २० गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
तळोजामधील पेठाली गावातील मनोज पाटील हे गाड्या भाड्याने घेऊन कंपनीमध्ये लावण्याचे काम करत. सुरुवातील भाड्याने घेतलेल्या गाड्याचे पैसे ते नियमितपणे गाडी मालकांना देत असे. मात्र, काही महिन्यात मनोज पाटील पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. याबाबत गाडी मालकाकडून विचारना केल्यावर त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने गाडीमालकाने तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी पाटील याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याच्याकडून विविध कंपनीच्या गाड्या जप्त केल्या आहेत.

Web Title: The arrest of the caramel cheater