शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासक की फक्त निबंधकांचे पगारी एजंट; जाब विचारल्यास पोलिसांची भीती दाखवतात, रहिवाशांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 06:11 IST

नवी मुंबईच्या उपनिबंधक कार्यालयाने माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीत २० प्रशासक तब्बल १८६ सोसायट्यांवर कार्यरत आहेत.

वैभव गायकरपनवेल : एक वर्षाहून अधिक काळ  निबंधकांनी निवडलेले प्रशासक सोसायट्यांवर कार्यरत राहू शकत नसतानादेखील पनवेल, नवी मुंबईत सहकार कायद्याची ऐशी तैशी सुरू आहे. सोसायट्यांवर कार्यरत असलेले हे प्रशासक केवळ अधिकाऱ्यांचे एजंट बनून पगारासाठीच नियुक्त केले असल्याचा आरोप ज्या सोसायट्यांवर प्रशासक नियुक्त आहेत तेथील रहिवाशांनी केला आहे.

नवी मुंबईच्या उपनिबंधक कार्यालयाने माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीत २० प्रशासक तब्बल १८६ सोसायट्यांवर कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत एक प्रशासक नेमका कुठे कुठे लक्ष देईल? असा प्रश्न उद्भवत आहे. एक प्रशासक तीन पेक्षा जास्त संस्थांवर कार्यरत राहू शकत नसताना नवी मुंबई मध्ये सर्रास एक प्रशासक २२ ठिकाणी कार्यरत आहे. हे दिसत असूनही निबंधक कार्यालयाचे डोळे उघडताना दिसत नसल्याचे चित्र आहे.

ज्या सहकार कायद्याच्या आधारावर निबंधक कार्यालये सुरू आहेत. त्यालाच हरताळ फासल्याचा धक्कादायक प्रकार माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष बसवेकर यांनी उजेडात आणला. विशेष म्हणजे शेकडो सोसायट्यांवर ठाण मांडून बसलेल्या प्रशासकांविरोधात अनेक जण समोर येऊन बोलण्याचे धाडस करीत नाहीत. निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारल्यास ते आमच्यावर दबाव टाकून पोलिसांची भीती दाखवत असल्याचा आरोप कामोठे येथील मोरेश्वरधाम सोसायटीचे रहिवासी आरोप प्रल्हाद पुकळे यांनी केला आहे. असाच अनुभव याच सोसायटीतील आयुब पठाण या रहिवाशालादेखील आलेला आहे.

दोन ते अडीच लाखांचा भुर्दंडउलवे येथील सिटी एव्हेन्यू या सोसायटीत तीन वर्षे तीन वेगवेगळे प्रशासक कार्यरत होते. त्यांच्यामुळे  तब्बल दोन ते अडीच लाखांचा भुर्दंड सोसायटीवर पडला. एवढे होऊनदेखील आजही आमच्या सोसायटीचे बँक खाते कार्यरत नाही. प्रशासकांनी संस्थेचे काम सुरळीत करण्याऐवजी आणखी बिघडवले असल्याचा आमचा आरोप असल्याचे येथील रहिवासी पूनम येवले यांनी सांगितले.

घाम गाळून विकत घेतलेल्या गृहसंकुलात प्रशासक राज्य करीत आहेत. रहिवासी सोसायटी चालवायला तयार असताना निबंधकामार्फत निवडणुका घेतल्या जात नाहीत.  सहकार कायदा पायदळी तुडवूनदेखील याबाबत काहीच कारवाई होत नाही.- प्रल्हाद पुकळे (सभासद, मोरेश्वर धाम सोसायटी ,कामोठे)

जानेवारी २०२३ ते मार्च २०२५ पर्यंत तीन निबंधकाच्या कार्यकाळात तीन प्रशासक आमच्या सोसायट्यांवर कार्यरत होते. आजही सोसायटीचे अकाउंट आमच्या नियंत्रणात नाही, रीतसर ऑडिट झालेले नाही. तीन प्रशासकाच्या कार्यकाळात जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचे मानधन प्रशासकांनी घेतले आहे. या सर्व प्रकाराबाबत निबंधकांचीच योग्य ती चौकशी करावी.- पूनम येवले ( रहिवासी, सिटी एव्हेन्यू सोसायटी, उलवे )

निबंधक कार्यालयाकडे स्टाफची कमतरता असल्याने अनेक पत्रव्यवहार केलेल्या दस्तऐवजांचे गठ्ठेच्या गठ्ठे कार्यालयात पडून आहेत. पत्रांना उत्तरे मिळत नाहीत. नेमलेले प्रशासक महिना महिना आपला अहवाल सहनिबंधक ,उपनिबंधकांना सादर करीत नाहीत. थकीत वसुलीसाठी पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे. - करण शिंदे (अध्यक्ष, सहकार भारती संस्था, पनवेल महानगर)

English
हिंदी सारांश
Web Title : Administrators: Paid Agents of Registrars? Residents Allege Harassment, Police Threats.

Web Summary : Panvel residents allege administrators appointed by registrars exploit societies, prioritizing pay over resident needs. Despite legal limits, single administrators manage excessive societies, prompting inaction from registrar offices. Questioning leads to alleged threats and financial burdens, residents claim.