विनाचर्चा ५०० कोटींच्या कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:50 AM2019-01-20T00:50:34+5:302019-01-20T00:50:36+5:30

किरकोळ विषयावर तासन्तास चर्चा करणाऱ्या नगरसेवकांनी ५०० कोटींपेक्षा जास्त खर्चाचे प्रस्ताव चर्चा न करताच मंजूर केले.

Approval of 500 crores of unnecessary works | विनाचर्चा ५०० कोटींच्या कामांना मंजुरी

विनाचर्चा ५०० कोटींच्या कामांना मंजुरी

Next

नवी मुंबई : किरकोळ विषयावर तासन्तास चर्चा करणाऱ्या नगरसेवकांनी ५०० कोटींपेक्षा जास्त खर्चाचे प्रस्ताव चर्चा न करताच मंजूर केले. तरण तलाव, सायन्स पार्कसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा झाली नाही. सभागृहात बोलू न दिल्यामुळे विरोधकांनीही नाराजी व्यक्त केली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये रस्ते, गटार, पदपथ व इतर कमी खर्चाच्या प्रस्तावांवरही तासन्तास चर्चा केली जाते; परंतु शनिवारी झालेल्या सभेमध्ये धोरणात्मक विषयांवरही काहीच चर्चा झाली नाही. वाशी सेक्टर १२ मधील भूखंड क्रमांक १९६ व १९६ए वर बसस्थानक, वाणिज्य संकुल व आॅलम्पिक दर्जाचा तलरण तलाव उभारण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. १४९ कोटी २४ लाख रुपयांच्या प्रस्तावावरही कोणीच फारशी चर्चा केली नाही. एम. के. मढवी यांनी अशाप्रकारचा तलाव ऐरोलीमध्येही उभारण्याची मागणी केली. नेरुळ सेक्टर १९ ए मधील वंडर्स पार्कच्या जागेवर सायन्स पार्क उभारण्यात येणार आहे. ३४०७६ चौरस मीटर भूखंडावर सायन्स पार्क केले जाणार असून, त्यासाठी तब्बल ११० कोटी ३५ लाख रुपये खर्च होणार आहेत. शहरातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पावरही कोणीच चर्चा केली नाही.
महानगरपालिकेने शहरात अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र उभारली आहेत; परंतु या ठिकाणी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा फारसा वापरच होत नाही. नेरुळ सेक्टर ५० मधील केंद्रातील पाणी उद्यानांना वापरण्याच्या ११ कोटी ३२ लाख रुपयांच्या प्रस्तावावरही काहीच चर्चा झाली नाही. तब्बल ५०० कोटींपेक्षा जास्त रकमेचे प्रस्ताव सभागृहात मांडले व तत्काळ मंजुरी दिली. वास्तविक प्रस्तावावर चर्चा करून त्यामधील त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक असताना नगरसेवकांनी स्वीकारलेल्या मौनाविषयी कामकाज पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली.
>विरोधकांचा सभागृहात ठिय्या
बोलू न दिल्यामुळे शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी व विनया मढवी यांनी सभागृहात ठिय्या मांडला. शिवसेनेच्या इतरही काही नगरसेवकांनी खाली बसून, सत्ताधाºयांच्या कार्यपद्धतीला आक्षेप घेतला. महापौरांनाही घेराव घालून राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला, यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही व्यासपीठावर जाऊन राजदंड पळविण्यापासून शिवसेना नगरसेवकांना रोखले. विनया मढवी यांनी महापौरांना उद्देशून वापरलेल्या शब्दाला राष्ट्रवादीने आक्षेप घेऊन माफी मागण्याची मागणी केली.

Web Title: Approval of 500 crores of unnecessary works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.