शूटिंगबॉल प्रशिक्षकपदी रेवप्पा गुरव यांची नियुक्ती

By योगेश पिंगळे | Updated: February 24, 2024 17:36 IST2024-02-24T17:35:13+5:302024-02-24T17:36:19+5:30

राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांत सहभागी होऊन पारितोषिके पटकाविली आहेत.

Appointed Revappa Gurav as Shooting Ball Coach | शूटिंगबॉल प्रशिक्षकपदी रेवप्पा गुरव यांची नियुक्ती

शूटिंगबॉल प्रशिक्षकपदी रेवप्पा गुरव यांची नियुक्ती

नवी मुंबई : महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांची २ व ३ मार्चला नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियम येथे होणाऱ्या आयएसबीएफ शूटिंगबॉल वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय शूटिंगबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. गुरव यांनी यापूर्वी अनेक वर्ष भारतीय शूटिंगबॉल संघात प्रतिनिधित्व केले. भारतीय शूटिंगबॉल संघाचे कर्णधारपदही भूषविले आहे.

राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांत सहभागी होऊन पारितोषिके पटकाविली आहेत. शूटिंगबॉल वर्ल्डकप स्पर्धेत कॅनडा, श्रीलंका, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, यूएई, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, नेपाळ यांच्यासह यजमान भारत देशाचा संघ सहभागी होत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावर झालेल्या नियुक्तीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Web Title: Appointed Revappa Gurav as Shooting Ball Coach