शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय घोटाळ्याप्रकरणी ‘APMC’ संचालक संजय पानसरेंना अटक; शशिकांत शिंदेंच्या अडचणी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 07:45 IST

या प्रकरणी डिसेंबर महिन्यात पोलिसांनी ठेकेदारासह तिघांना अटक केली होती, या प्रकणाचा तपास सुरू असताना मंगळवारी रात्री संचालक संजय पानसरे यांना चौकशीसाठी बोलवले होते

नवी मुंबई : ‘एपीएमसी’मधील शौचालय घोटाळा प्रकरणी पोलिसांनी संचालक संजय पानसरेंना अटक केली आहे. साडेसात कोटींच्या शौचालय ठेका घोटाळ्यात त्यांचेही नाव चर्चेत होते. पानसरेंच्या अटकेनंतर बाजार समितीचे संचालक असलेले सातारा लोकसभा  मतदासंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवीत असलेले आ. शशिकांत शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता  वर्तविण्यात येत आहे.

एपीएमसी आवारातील शौचालयाच्या ठेक्यात साडेसात कोटींचा अपहार झाल्याचा ठपका ठेवून या प्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी डिसेंबर महिन्यात पोलिसांनी ठेकेदारासह तिघांना अटक केली होती, या प्रकणाचा तपास सुरू असताना मंगळवारी रात्री संचालक संजय पानसरे यांना चौकशीसाठी बोलवले होते. चौकशीअंती त्यांनाही अटक करण्यात आली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता शुक्रवारपर्यंतची पोलिस कोठडी मिळाली आहे. 

इतर संचालकही येणार अडचणीत?या प्रकरणात सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढवीत असलेले बाजार समितीचे संचालक आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह बाजार समितीचे तत्कालीन संचालक मंडळ आणि इतर अधिकाऱ्यांचीही नावे आहेत. यामुळे पुढील काही दिवसांत इतरांनाही अटकेची सूत्रे हलणार असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे शिंदेंपुढील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संस्थेशी आर्थिक लागेबांधे असल्याचा संशयसंजय पानसरे यांनी निर्मला औद्योगिक संस्थेचे मासिक भाडे ६१ हजार रुपये इतके असताना ते ८ हजार रुपये इतके कमी करण्याच्या प्रस्तावाला अनुमोदन दिल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. तसेच संस्थेशी त्यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचा संशय आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shashikant Shindeशशिकांत शिंदेsatara-pcसातारा