हत्ये प्रकरणी आणखी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 01:04 IST2018-01-15T01:04:14+5:302018-01-15T01:04:20+5:30

गुड्डू सुवर्ण याच्या हत्ये प्रकरणी नेरुळ पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. रमीज हाबीद खान, असे त्याचे नाव असून

Another person was arrested in the murder case | हत्ये प्रकरणी आणखी एकाला अटक

हत्ये प्रकरणी आणखी एकाला अटक

नवी मुंबई : गुड्डू सुवर्ण याच्या हत्ये प्रकरणी नेरुळ पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. रमीज हाबीद खान, असे त्याचे नाव असून, त्याने मारेक-याकडे दिलेल्या कट्ट्याचा वापर गुड्डूच्या हत्येसाठी झाला होता. तपासादरम्यान मयत गुड्डू हादेखील गुन्हेगार होता, अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
नेरुळ सेक्टर ११ येथील आदिल डेव्हलपर्सच्या कार्यालयात गुन्हेगारांना थारा मिळत होता, अशी माहिती उघड झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्या ठिकाणी गुड्डू सुवर्ण याची गोळी झाडून हत्या झाली होती. गुड्डू हा आदिल डेव्हल्पर्सच्या कार्यालयात काम करायचा. तर त्याच ठिकाणी काम करणाºया गौरव सिंग याने किरकोळ वादातून त्याच्यावर गोळी झाडली होती. या प्रकरणी पोलिसांनी २४ तासांच्या आत त्याला अटक केली आहे.
चौकशीत त्याने गुन्ह्यासाठी वापरलेला गावठी कट्टा समीज हाबीद खान याचा होता, असे पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार खान याला सीवूड परिसरातून अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपुत यांनी सांगितले. गुड्डू याच्यावर मुंबईत अनेक गुन्हे दाखल असून, त्याला मुंबईतून तडीपार करण्यात आले होते. सध्या तो नवी मुंबईत आदिल डेव्हल्पर्सच्या कार्यालयातच राहत होता. या दरम्यान किरकोळ वादातून गौरव याने गुड्डूची हत्या केली; परंतु रमीज याने तो गावठी कट्टा कुठून व कशासाठी घेतला होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Another person was arrested in the murder case

टॅग्स :Arrestअटक