अनंत गीते यांनी केली सावित्री पुलाची पाहणी
By Admin | Updated: May 30, 2017 04:08 IST2017-05-30T04:08:19+5:302017-05-30T04:08:19+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर सावित्री नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचे ५ जून रोजी लोकार्पण होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी,

अनंत गीते यांनी केली सावित्री पुलाची पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : मुंबई-गोवा महामार्गावर सावित्री नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचे ५ जून रोजी लोकार्पण होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या वेळी उपस्थित राहणार आहेत. सोमवारी रायगडचे खासदार आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी भेट देऊन, या पुलाच्या कामाच्या प्रगतीची माहिती घेतली.
या वेळी राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड महसूल विभागाचे अधिकारी, शिवसेनेचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. १८० दिवसांत या पुलाची उभारणी करण्याची अट निविदेत घालण्यात आली होती.