उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदाम, पिस्त्याचे दर वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 12:29 AM2019-08-22T00:29:54+5:302019-08-22T00:30:12+5:30

पावसाळ्यामुळे दोन महिने बाजार समितीमध्ये सुक्यामेव्याची आवक कमी झाली होती. नागरिकांकडून मागणी कमी झाली होती. गणेशोत्सव जवळ आल्यापासून पुन्हा आवक वाढू लागली आहे.

 Almonds, pistachio rates increased after the festival | उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदाम, पिस्त्याचे दर वाढले

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदाम, पिस्त्याचे दर वाढले

Next

नवी मुंबई : गणेशोत्सव जवळ आल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुक्यामेव्याची आवक वाढू लागली आहे. सद्यस्थितीत प्रतिदिन १०० ते १५० टन आवक होऊ लागली आहे. काजूसह अक्रोडचे दर स्थिर असले तरी बदाम, पिस्त्याचे दर काही प्रमाणात वाढले आहेत.
पावसाळ्यामुळे दोन महिने बाजार समितीमध्ये सुक्यामेव्याची आवक कमी झाली होती. नागरिकांकडून मागणी कमी झाली होती. गणेशोत्सव जवळ आल्यापासून पुन्हा आवक वाढू लागली आहे. गणपती ते दिवाळी या कालावधीमध्ये मसाला मार्केटमध्ये सुक्यामेव्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. या आठवड्यामध्ये प्रतिदिन १०० ते १५० टन आवक रोज होत आहे. होलसेल मार्केटमध्ये अंजीर १ हजार ते १८०० रुपये किलो दराने विकले जात आहे. काजू ७०० ते ११०० रुपये, खजूर ७० ते १३५,अक्रोड ६०० ते ८०० रुपये किलो दराने विकले जात असून तीनही वस्तूंचे दर स्थिर आहेत.
बदामाचे दर आॅगस्टच्या सुरूवातीपासून वाढण्यास सुरवात झाली आहे. जुलैमध्ये ५८० ते ९०० रुपये किलो दराने बदामाीविक्री होत होती. सद्यस्थितीमध्ये हे बाजारभाव ६३० ते ९५० रुपयांवर गेले आहेत. खारीकचे दर १३० ते ३०० रुपयांवरून १८० ते ३६० रुपये किलो एवढे झाले आहेत. पिस्त्याचे दर १५०० ते १९०० वरून १६०० ते २२०० रुपये झाले आहेत. बाजार समितीमध्ये अफगाणिस्तान, इराण, इराक, अमेरिका, काश्मीर व इतर ठिकाणावरून सुकामेवा विक्रीसाठी येत असून गणेशोत्सवापर्यंत मागणी अजून वाढण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

होलसेल मार्केटमध्ये आवक
व बाजारभाव पुढीलप्रमाणे
वस्तू आवक किंमत
(टन) (प्रतिकिलो)
काजू ३० ७०० ते ११००
अंजीर ३ १००० ते १८००
बदाम ५१ ६३० ते ९५०
खजूर २० ७० ते १३५
पिस्ता २ १६०० ते २२००
आक्रोड ९ ६०० ते ८००

Web Title:  Almonds, pistachio rates increased after the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.