ऐरोलीत भरावामुळे खारफुटीचे अस्तित्व धोक्यात, महानगरपालिकेकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 11:12 PM2020-10-31T23:12:27+5:302020-10-31T23:12:45+5:30

Airoli : भरती व पुराचे पाणी शहरात शिरू नये, यासाठी सिडकोने शहरात विविध ठिकाणी खाडीला लागून होल्डिंग पाँड तयार केले आहेत. ऐरोली सेक्टर १४, १५ मध्येही होल्डिंग पाँड तयार केला आहे.

Airoli's filling threatens Kharfuti's existence | ऐरोलीत भरावामुळे खारफुटीचे अस्तित्व धोक्यात, महानगरपालिकेकडे तक्रार

ऐरोलीत भरावामुळे खारफुटीचे अस्तित्व धोक्यात, महानगरपालिकेकडे तक्रार

Next

नवी मुंबई : ऐरोली सेक्टर १४, १५ मधील होल्डिंग पाँडजवळून रोडचे काम सुरू आहे. या कामासाठी सुरू असलेल्या भरावामुळे खारफुटीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या भरावाच्या कामाची चौकशी करावी व नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भरती व पुराचे पाणी शहरात शिरू नये, यासाठी सिडकोने शहरात विविध ठिकाणी खाडीला लागून होल्डिंग पाँड तयार केले आहेत. ऐरोली सेक्टर १४, १५ मध्येही होल्डिंग पाँड तयार केला आहे. वाशीतील मिनी सिशोर व नेरुळमधील ज्वेल्स ऑफ नवी मुंबईप्रमाणे या परिसराचे सुशोभीकरण करण्याची मागणी स्थानिक नगरसेविका संगीता पाटील व अशोक पाटील यांनी वारंवार महानगरपालिकेकडे केली आहे. होल्डिंग पाँडमधील गाळ काढण्याचीही मागणी केली आहे. भराव करायला नक्की किती व कुठे परवानगी आहे, भरावामुळे किती खारफुटीचे नुकसान झाले, याची चौकशी करण्यात यावी व नियमांचे उल्लंघन झाले असल्यास कारवाई करण्याची मागणी केली आहे.

माहिती फलक लावावेत 
सद्यस्थितीमध्ये येथून रोडचे व खाडीपुलाचे काम सुरू आहे. सदर काम करताना ठेकेदाराकडून खारफुटीमध्ये ही भराव केला जात आहे. खारफुटीचे नुकसान होत आहे. काम करताना नक्की कुठे व कसा भराव करायला परवानगी आहे, याविषयी माहिती फलकही लावण्यात आलेले नाहीत. यामुळे परिसरातील नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Airoli's filling threatens Kharfuti's existence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.