शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोलीत पालिका कर्मचाऱ्याकडून दुकानदाराला मारहाण

By admin | Updated: December 22, 2016 06:40 IST

अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान पालिका कर्मचाऱ्याकडून दुकानदाराला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. ऐरोलीत

नवी मुंबई : अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान पालिका कर्मचाऱ्याकडून दुकानदाराला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. ऐरोलीत घडलेल्या या मारहाण प्रकरणी दुकानदाराने त्या कर्मचाऱ्याविरोधात रबाळे पोलिसांकडे तक्रार केली आहे. मार्जिनल स्पेसमध्ये नसलेले साहित्य देखील कारवाईच्या बहाण्याने उचलले जात असताना त्यास विरोध केल्याने हा प्रकार घडला.शंकरलाल भंडारी असे जखमी दुकानदाराचे नाव आहे. त्यांचे ऐरोली सेक्टर १६ येथे उत्सव स्टील भांड्याचे दुकान आहे. बुधवारी दुपारी विभाग कार्यालयाच्या अतिक्रमण विरोधी पथकामार्फत परिसरात कारवाई सुरु होती. यावेळी भंडारी यांच्या दुकानाचा बोर्ड व काही साहित्य जप्त करण्याला पथकाने सुरुवात केली. परंतु तो बोर्ड व भांडी मार्जिनल स्पेसमध्ये नसल्याचे सांगत भंडारी यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना अडवले. यावेळी एका कर्मचाऱ्याने हातातील लोखंडी स्टूल तोंडावर मारल्याचा भंडारी यांचा आरोप आहे. यामध्ये त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून व्यापाऱ्याकडून घडलेल्या प्रकाराचा संताप व्यक्त होत आहे. कारवाईवेळी पथकातील काही तरुण मद्यधुंद अवस्थेत होते असेही त्यांचे म्हणणे आहे. हा प्रकार त्यांच्यासोबतच्या जाधव नावाच्या अधिकाऱ्याला सांगितला असता, त्यांनीही मान्य करत कारवाईवेळी ते मद्यपान करुनच येतात असे उत्तर दिल्याचे भंडारी यांनी सांगितले. त्यानुसार घडलेल्या प्रकाराची त्यांनी रबाळे पोलिसांकडे तक्रार केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते. (प्रतिनिधी)