शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मुंबईतील हवा समाधानकारक, नवी मुंबईतील वातावरण प्रदूषित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 5:41 AM

दिल्लीमध्ये बुधवारी सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण ४७२ एवढे नोंदविण्यात आले

मुंबई : दिल्लीमध्ये बुधवारी सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण ४७२ एवढे नोंदविण्यात आले असून, महिन्याभरानंतरही दिल्ली आणि लगतच्या परिसराचा श्वास कोंडलेला आहे. आता केवळ दिल्लीच नाही, तर मुंबईसह नवी मुंबईही दिवसागणिक प्रदूषित होत असून, येथे उठत असलेल्या धूलिकणांमुळे नागरिकांचा श्वास कोंडला आहे. महत्त्वाचे म्हणजे, बुधवारी मुंबईत ठिकठिकाणची हवा समाधानकारक नोंदविण्यात आली असतानाच, मुंबईच्या तुलनेत नवी मुंबई प्रदूषित नोंदविण्यात आली आहे.नवी मुंबईत सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण ३२१ पार्टीक्युलेट मॅटर आहे, तर मुंबईत ते ११४ पार्टीक्युलेट मॅटर आहे. दिल्लीसह लगतच्या परिसरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी तेथील सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र, अद्यापही त्यांना पुरेसे यश आलेले नाही. दिल्ली वरचेवर प्रदूषित होत असतानाच दुसरीकडे मुंबईसह लगतच्या परिसरातील हवादेखील प्रदूषित होत असल्याची नोंद ‘सफर’ या हवेची गुणवत्ता मोजत असलेल्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे.मुंबई, नवी मुंंबईच्या या पूर्वीच्या नोंदी पाहिल्या असता, मुंबईतील बहुतांश म्हणजे अंधेरी, बीकेसी आणि माझगावसारखी ठिकाणे प्रदूषित म्हणून नोंदविली जात होती. मात्र, मध्यंतरी चक्रीवादळामुळे पडलेल्या पावसानंतर येथील हवेची गुणवत्ता समाधानकारक नोंदविण्यात आली.भारतीय हवामान शास्त्र विभागानेही याची नोंद घेत, पावसामुळे येथील धूलिकणांचे प्रमाण कमी झाल्याचे म्हटले होते. मात्र, असे असले, तरीदेखील भविष्यात थांबलेला पाऊस आणि वाहनांच्या धुरामुळे धूलिकणांत वाढ होईल आणि तापमानात वाढ होईल, अशीही शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. ही शक्यता वर्तवितानाच थंडीच्या ऋतूमध्ये धूलिकणांचे प्रमाण वाढेल, अशीही शक्यता वर्तविण्यात आली होती. दरम्यान, दिल्लीसारखी स्थिती मुंबईत नसून, समुद्राहून वाहते वारे मुंबईच्या हवेतील गुणवत्ता समाधानकारक ठेवण्यास मदत करत आहेत, याचा दाखला हवामान खात्याने दिला आहे.>...यामुळेच बिघडले नवी मुंबईचे वातावरणनवी मुंबईमध्ये सातत्याने सुरू असलेली बांधकामे, कारखाने, खाणकामे हे घटक हवेतील धूलिकणांमध्ये भर घालतात. केवळ हेच घटक नाहीत, तर वाहनांचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे होणारे प्रदूषणही वातावरण आणखी वाईट करत आहे.हवेची गुणवत्ता(सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण पार्टीक्युलेट मॅटरमध्ये)दिल्ली - ४७२ तीव्रनवी मुंबई - ३२१ अत्यंत वाईटअहमदाबाद - १९४ अंत्यत वाईटमुंबई - ११४ वाईटपुणे - ८८ मध्यमचांगली : ० ते ३०समाधानकारक : ३० ते ६०मध्यम : ६० ते ९०वाईट : ९० ते १२०अत्यंत वाईट : १२० ते २५०तीव्र : २५० ते ३८०नवी मुंबई - ३२१ अत्यंत वाईटबोरीवली - ९८ समाधानकारकमालाड - ९१ समाधानकारकभांडुप - ६३ समाधानकारकअंधेरी - १२२ मध्यमबीकेसी - १९९ मध्यमचेंबूर - ७० समाधानकारकवरळी - १८ चांगलीमाझगाव - ९५ समाधानकारक