अनधिकृत झोपडपट्टी कारवाईनंतरही हटेना

By Admin | Updated: January 26, 2017 03:35 IST2017-01-26T03:35:05+5:302017-01-26T03:35:05+5:30

अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. एपीएमसी येथील मोकळ्या भूखंडावरील अनधिकृत झोपडपट्टी

After the unauthorized slum action, he did not go | अनधिकृत झोपडपट्टी कारवाईनंतरही हटेना

अनधिकृत झोपडपट्टी कारवाईनंतरही हटेना

नवी मुंबई : अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. एपीएमसी येथील मोकळ्या भूखंडावरील अनधिकृत झोपडपट्टी हटवल्यानंतरही पुन्हा त्याठिकाणी झोपड्यांचे साम्राज्य उभे राहिले आहे. परंतु त्याठिकाणी गुन्हेगारांचे वास्तव्य होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे.
एपीएमसी सेक्टर १९ येथील मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या उभारण्यात आलेल्या आहेत. हा भूखंड सिडकोच्या ताब्यात असून गत महिन्यातच त्याठिकाणच्या झोपड्यांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र या कारवाईनंतरही पुन्हा त्या भूखंडावर झोपड्यांचे साम्राज्य उभे राहू लागले आहे. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे. सदर झोपडपट्टीमध्ये वास्तव्य असणारी एक महिला गांजा तसेच इतर अमली पदार्थांची विक्री करायची. याप्रकरणी तिच्यावर पोलिसांनी कारवाई देखील केलेली आहे. त्यानंतर पुन्हा नव्याने निर्माण होत असलेल्या त्याठिकाणच्या झोपडपट्टीत सदर महिलेकडून अमली पदार्थ विक्रीचा अड्डा चालवला जाण्याची शक्यता आहे. सिडकोसह पालिका प्रशासनाकडून अनधिकृत झोपड्या हटवण्याच्या कामावर लाखोचा खर्च केला जात आहे. परंतु कारवाई करून मोकळ्या केलेल्या भूखंडाला कुंपण घालून पुन्हा त्यावर अतिक्रमण होवू नये याची खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे एकाच भूखंडावर सातत्याने उभारल्या जाणाऱ्या अनधिकृत झोपड्यांवर वारंवार कारवाई करण्याची गरज भासत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: After the unauthorized slum action, he did not go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.