शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

आमदार कपिल पाटील यांच्या भेटीनंतर सागर गोरखेंचे उपोषण मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 19:02 IST

कारागृतील समस्याची माहिती पाटील यांनी घेतल्यानंतर गोरखे यांनी सातव्या दिवशी आपले उपोषण सोडले.

वैभव गायकर

पनवेल - तळोजा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना पाणी टंचाईची झळ बसत आहे. पुरेसा पाणी मिळत नसल्यामुळे एल्गार परिषदेचे सागर तात्याराम गोरखे या कैद्याने आमरण उपोषण घोषित केले होते. या विषयावरून आमदार कपिल पाटील यांनी शुक्रवारी गोरखे यांची भेट घेतली. कारागृतील समस्याची माहिती पाटील यांनी घेतल्यानंतर गोरखे यांनी सातव्या दिवशी आपले उपोषण सोडले.

कपिल पाटील यांनी भेट घेतल्यावर गोरखेनी आपले उपोषण मागे घेतले. यासंदर्भात पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना यासंदर्भात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.  गृहमंत्र्यांनी कपिल पाटील यांना आश्वासन दिले आहे. कारागृहातील पाणीपुरवठ्याचा विषय सिडकोशी निगडिट असल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले. त्यानुसार सिडको प्रशासन पाणीपुरवठा पुरवत करणार आहे. दुसरा विषय आरोग्याशी निगडित असून कैद्यांना उद्यापासून कोविडचे दुसरे डोस दिले जाणार असल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले.

कारागृहाबाहेर कैद्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना बसण्यासाठी प्रतिक्षालय नाही. याबाबत स्थानिक आमदारांना आमदार निधीतून हे प्रतिक्षालय उभारण्यासंदर्भात विनंती करणार असल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले. उपोषण छेडलेल्या सागराला याव्यतिरिक्त कोणताच त्रास नसल्याचे आमदार कपिल पाटील यांनी सांगितले.

तळोजा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. हजारापेक्षा जास्त कैद्यांचा अतिरिक्त भरणा कारागृहात करण्यात आल्याने त्याचा परिणाम संपूर्ण कारागृहावर पडत आहे. विशेष म्हणजे अंडासेलमधील व्हीआयपी कैद्याच्या तुलनेत सर्वसामान्य कैद्यांना सोयी सुविधा मिळत नाहीत.याबाबत कोणीही बोलण्यास पुढे येत नाही.

राज्यातील सर्वच कारागृहात सोयी सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने राज्यशासनाला पत्र लिहिणार आहे. माझ्या भेटीनंतर सागर गोरखे यांनी सातव्या दिवशी उपोषण सोडले आहे.- कपिल पाटील (आमदार ) 

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलjailतुरुंग