नवव्या दिवशी पळस्पे ग्रामस्थांचे उपोषण मागे, उपोषण  सोडविण्यास पुढाकार घेणाऱ्या प्रांत अधिकाऱ्यांना बांधली राखी 

By वैभव गायकर | Published: August 30, 2023 05:11 PM2023-08-30T17:11:26+5:302023-08-30T17:12:08+5:30

प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांनी पुढाकार घेत ग्रामस्थ, गोदाम चालक, गृहप्रकल्पाचे प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेत या मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

After the hunger strike of Palaspe villagers back on the ninth day | नवव्या दिवशी पळस्पे ग्रामस्थांचे उपोषण मागे, उपोषण  सोडविण्यास पुढाकार घेणाऱ्या प्रांत अधिकाऱ्यांना बांधली राखी 

नवव्या दिवशी पळस्पे ग्रामस्थांचे उपोषण मागे, उपोषण  सोडविण्यास पुढाकार घेणाऱ्या प्रांत अधिकाऱ्यांना बांधली राखी 

googlenewsNext


पनवेल : पळस्पे गावाभोवती मोठ मोठे गोदामे आणि गृहप्रकल्पांचे जाळे पसरत आहे.या गोदामांचे सांडपाणी शेतीत घुसल्याने भात शेतीचे मोठे नुकसान होत आहे.भातशेतीचे होणारे नुकसान तसेच ग्रामस्थांना होणार त्रास लक्षात घेता दि.21 रोजी पुकारलेले आमरण उपोषण दि.29 रोजी 9 व्या दिवशी मागे घेण्यात आले. प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांनी पुढाकार घेत ग्रामस्थ, गोदाम चालक, गृहप्रकल्पाचे प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेत या मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

पळस्पे येथील जेडब्लूसी लॉजिस्टिक पार्क,ओशियन गेट कंपनी,टेक केअर कंपनी आणि अरिहंत बिल्डर्स यांच्या कडून शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहेत.याकरिता दमयंती भगत,शालिनी ठाणगे,सविता घरत,निलेशा भगत,दर्शना बेडेकर,संजय भगत,चंद्रकांत भगत,कमलाकर भगत,नमित बेडेकर आदी ग्रामस्थ पळस्पे हायवे ब्रिज याठिकाणी 11 ग्रामस्थ उपोषणाला बसले होते.नव्यव्या  दिवशी प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांनी दोन वेळा उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांची समजूत काढत त्यांना उपोषण सोडण्यास सांगितले.यावेळी शेकाप नेते अनिल ढवळे,ऍडव्होकेट सुरेश ठाकुर,इक्बालशेठ काझी  देखील सोबत होते.ईकबालशेठ काझी यांनी मागच्या वेळेस आंदोलना दरम्यान तब्बेत बिघडलेल्या महिलेच्या कुटुंबियांना लाखोंची मदत केली.त्याबाबत देखील ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.       

आंदोलनकर्त्यांची शेकाप आमदार जयंत पाटील यांनी देखील भेट घेतली होती. प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांनी यावेळी सांगितले की ; पळस्पे वासियांची मागणी रास्त असुन याबाबत आम्ही गोदाम मालक आणि बांधकाम व्यावसायिकांना सुचना केल्या आहेत.शाळेला असलेला धोका लक्षात घेता शालेभोवती सुरक्षा भिंत उभारण्याचे देखील अरिहंत ग्रुप
 

Web Title: After the hunger strike of Palaspe villagers back on the ninth day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.