नवी मुंबई विमानतळावरून आता  ‘इंडिगो’पाठोपाठ आता ‘अकासा एअर’चीही विमाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:25 IST2025-06-07T12:24:24+5:302025-06-07T12:25:17+5:30

‘अकासा एअर’ सुरुवातीला आठवड्याला १०० अधिक देशांतर्गत विमाने चालवणार आहे

After IndiGo, now Akasa Air also operates from Navi Mumbai Airport | नवी मुंबई विमानतळावरून आता  ‘इंडिगो’पाठोपाठ आता ‘अकासा एअर’चीही विमाने

नवी मुंबई विमानतळावरून आता  ‘इंडिगो’पाठोपाठ आता ‘अकासा एअर’चीही विमाने

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: ‘इंडिगो’पाठोपाठ आता ‘अकासा एअर’ या विमान कंपनीचीही विमाने नवी मुंबईविमानतळावरून आकाशात झेपावणार आहेत. अकासाने नवी मुंबई विमानतळ कंपनीसोबत करार केल्यानंतर अदानी एअरपोर्ट होल्डिंगने ही माहिती शुक्रवारी दिली. ‘अकासा एअर’ सुरुवातीला आठवड्याला १०० अधिक देशांतर्गत विमाने चालवणार आहे. नंतर हिवाळ्यात ही संख्या आठवड्यातून ३०० हून अधिक देशांतर्गत आणि ५० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर जाईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

व्यापक नेटवर्क धोरणाचा एक भाग म्हणून अकासा एअरलाइन आर्थिक वर्ष २०२७ च्या अखेरीस मध्य पूर्व आणि आग्नेय आशियाई बाजारपेठांमध्ये आंतरराष्ट्रीय विस्तारावर लक्ष केंद्रित करून १० पार्किंग बेसपर्यंत पोहोचणार आहे. ‘अकासा एअर’चे संस्थापक आणि सीईओ इनय दुबे म्हणाले की, नवी मुंबई विमानतळावर आमचा प्रवेश हा ‘अकासा एअर’च्या दीर्घकालीन धोरणात्मक पाऊल आहे.

विमान उड्डाणांसाठी प्रमुख भागीदार

अदानी एअरपोर्ट होल्डिंगचे सीईओ अरुण बन्सल  यांनी सांगितले की, नवी मुंबई विमानतळावर एअरलाइन भागीदारांपैकी एक म्हणून अकासा एअरचे स्वागत करताना आनंद होत आहे. त्यांची जलद वाढ आणि दूरदृष्टी असलेला दृष्टिकोन त्यांना नवी मुंबई विमानतळाच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानोड्डांसाठी प्रमुख भागीदार बनवेल.

Web Title: After IndiGo, now Akasa Air also operates from Navi Mumbai Airport