जनतेच्या प्रश्नांना भिडणाऱ्या प्रशासकीय अधिकारी
By Admin | Updated: March 8, 2016 02:09 IST2016-03-08T02:09:17+5:302016-03-08T02:09:17+5:30
किमान ५०० मच्छीमार महिलांच्या गराड्यात एक अमराठी भाषिक महिला मराठी-हिंदी संमिश्र भाषेत संवाद साधते आणि त्या महिलाही कु टुंबातील ज्येष्ठ व्यक्तीशी बोलावे तितक्या आदराने, विश्वासाने बोलताहेत

जनतेच्या प्रश्नांना भिडणाऱ्या प्रशासकीय अधिकारी
नवी मुंबई : किमान ५०० मच्छीमार महिलांच्या गराड्यात एक अमराठी भाषिक महिला मराठी-हिंदी संमिश्र भाषेत संवाद साधते आणि त्या महिलाही कु टुंबातील ज्येष्ठ व्यक्तीशी बोलावे तितक्या आदराने, विश्वासाने बोलताहेत, ही कोणतीही प्रचार सभा नाही, संवाद साधणारी ही महिला कोणी कार्यकर्ती किंवा राजकीय पुढारी नाही, ती आहे एक प्रशासकीय अधिकारी व्ही. राधा सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका. जनतेचे प्रश्न लोकांमध्ये जावून आत्मीयतेने जाणून घेणे आणि त्यांची उकल करण्यासाठी सहानुभूतीपूर्वक तसेच न्याय मार्गाने सार्वमताचा आदर करून निर्णय घेते.
१९९४ साली भारतीय प्रशासकीय सेवेत आलेल्या राधा यांनी आजवर औरंगाबाद, पुणे आणि मुंबईत अनुक्रमे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपायुक्त अशी महत्त्वाची पदे भूषविली आहेत. मानव संसाधन विकास आणि कायदा यांचाही गाढा व्यासंग आहे. २०१३ मध्ये त्यांनी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका या पदाचा कार्यभार सांभाळला. नवी मुंबई शहर प्रकल्पग्रस्तांच्या १२.५ टक्के भूखंडाच्या वाटपात आणलेली सुसूत्रता, विमानतळ प्रकल्पग्रस्तांशी केलेल्या यशस्वी वाटाघाटी, कर्मचारी-अधिकारी यांच्यात सकारात्मक रुजवलेली विचारसरणी, विभागांच्या कार्यपद्धती लोकसुलभ करण्यासाठी प्रशासकीय करण्यासाठी प्रशासनिक प्रक्रियेत केलेली पुनर्रचना अशी बहुआयामी कामगिरी लीलया पार पाडत प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र कर्मचारी, अधिकारी यांच्या मनात एक आदराचं स्थान त्यांनी निर्माण केलं आहे. सिडकोचा कारभार हाती घेताच पहिला कार्यक्रम त्यांनी हाती घेतला तो गावभेटीचा. ही गावं होती विमानतळ प्रकल्पात येणारी. नवी मुंबई शहर प्रकल्पासाठी ज्या भूमिपुत्रांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या, त्यात संपूर्ण विस्थापित होणाऱ्या कुटुंबांची संख्या हाताच्या बोटावर मोजावी एवढीच होती. जमीन अधिग्रहित करण्यापेक्षा भूमिपुत्रांनी ती स्वेच्छेने हस्तांतरित करावी, ही भावना मनात ठेवून व्ही. राधा यांनी या कामाला प्रारंभ केला.
प्रकल्पग्रस्तांचा विश्वास संपादन करणं सहजसाध्य काम नव्हतं. इथली संस्कृती निराळी, भाषा वेगळी तरीही राधा मॅडमने हे शिवधनुष्य उचलण्याचं आव्हान स्वीकारलं. कारण त्या जाणून होत्या की, आत्मीयतेला भाषा नसते. आपल्या मनातील प्रामाणिक व स्वच्छ विचार हे याहृदयीचे त्या हृदयीचा प्रत्यय देतात. प्रकल्पग्रस्तांना मान्य असणारं तसेच प्रचलित भूसंपादन कायद्यातील तरतुदींच्या तुलनेत सर्वोत्तम पुनर्वसन आणि पुन:स्थापन पॅकेज शासनाकडून मंजूर करून घेण्यात व्ही. राधा यांना यश आलं.