शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील अनधिकृत झोपड्या हटवण्यात प्रशासन अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 02:31 IST

मोकळ्या भूखंडांवरील अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य हटवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे.

नवी मुंबई : मोकळ्या भूखंडांवरील अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य हटवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. बहुतांश ठिकाणी तीनपेक्षा अधिक वेळा कारवाया होऊनही पुन्हा तिथे झोपड्या थाटल्याचे चित्र अनेक नोडमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईला अनधिकृत झोपड्यांचा विळखा बसू लागला आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता अभियानाला बाधा निर्माण होत आहे, तर झोपड्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना थारा मिळत असल्याने त्याठिकाणी अमली पदार्थ विक्रीचे अड्डे चालवले जात आहेत. परिणामी शहरातील अनधिकृत झोपड्या मोठी डोकेदुखी ठरत चालल्या आहेत. अशा झोपड्या वेळीच हटवण्याची मागणी यापूर्वी अनेकदा पोलिसांनी देखील केलेली आहे. त्यानुसार अनेकदा अशा झोपड्यांवर कारवाई देखील केली जाते. मात्र, दुस-या दिवशीच पुन्हा त्याठिकाणी झोपड्या उभ्या राहत असल्याचेही पाहायला मिळते. सद्यस्थितीला शहरातील प्रत्येक नोडमध्ये असे अनेक भूखंड आहेत, ज्यावरील झोपड्यांवर सिडको अथवा पालिकेने अनेकदा कारवाया केल्या आहेत. यानंतरही झोपड्या कायमस्वरूपी हटत नसल्याने दोन्ही प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कोपरखैरणे रेल्वेस्थानकालगत एका भूखंडावर कारवाईवेळी पोलिसांवर दगडफेकीचाही प्रकार घडला होता. त्यामध्ये जखमी झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला गुडघ्याची शस्त्रक्रिया करावी लागली. यानंतर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावून या झोपड्या हटवण्यात आल्या होत्या; परंतु कारवाईच्या काही दिवसानंतर पुन्हा त्याठिकाणी दुपटीने झोपड्या वाढल्याचे दिसून येत आहे. त्यांनी पदपथांवर देखील ताबा मिळवला असून संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरवले आहे. त्याचप्रमाणे एपीएमसी येथील माथाडी भवन चौकालगतच्या युनियन बँक आॅफ इंडियाच्या शेजारील भूखंडावर देखील वर्षानुवर्षे हेच चित्र दिसून येत आहे. त्याठिकाणी झोपड्यांमध्ये गांजासह इतर अमली पदार्थ विक्रीचे अड्डे चालवले जात आहेत. त्यावर एपीएमसी पोलिसांनी अनेकदा कारवाई देखील केलेली आहे.मात्र, काही दिवसांनी पुन्हा झोपड्यांच्या आडून त्याठिकाणी अमली पदार्थ विक्रीचे अड्डे चालवले जात आहेत. या झोपडपट्टीवर मागील काही वर्षात सात ते आठ वेळा कारवाई झालेली आहे. यानंतरही सदर झोपडपट्टी हटण्याऐवजी तिथल्या झोपड्यांमध्ये वाढच होताना दिसून येत आहे. परिणामी रात्री अपरात्री सदर मार्गाने पायी चालत जाणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे अनधिकृत झोपड्यांवर कारवाईनंतर त्याठिकाणी कुंपण घालण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई