शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

गणेश नाईकांचा पत्ता कट; बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांना पुन्हा संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 17:15 IST

राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देवून महापालिकेतील 52 नगरसेवकांसह भाजपामध्ये दाखल झालेले माजी मंत्री गणेश नाईक यांना बेलापूर मतदार संघातून भाजपाने तिकिट नाकारले आहे.

नवी मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देवून महापालिकेतील 52 नगरसेवकांसह भाजपामध्ये दाखल झालेले माजी मंत्री गणेश नाईक यांना बेलापूर मतदार संघातून भाजपाने तिकिट नाकारले आहे. तसेच या मतदार संघातून पक्षाने पुन्हा मंदा म्हात्रे यांना संधी दिली आहे. त्यामुळे  नाईक यांना हा मोठा झटका मानला जात आहे. 

भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. नवी मुंबईतील ऐरोली मतदार संघातून अपेक्षेप्रमाणे गणेश नाईक यांचे पूत्र संदीप नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु नाईक स्वत: इच्छूक असलेल्या बेलापूरमधून मात्र पुन्हा मंदा म्हात्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे नाईक समर्थकांत कमालीची नाराजी पसरली आहे.  

दरम्यान, बेलापूरच्या जागेवर शिवसेनेने दावा केला होता. परंतू नवी मुंबईतील दोन्ही जागा भाजपच्या वाट्याला जाणार असल्याने युतीचा धर्म पाळण्याचे आदेश शिवसेना पक्षाध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी सोमवारी नवी मुंबईतील शिवसैनिकांना दिले होते. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या अनेक पदाधिका-यांनी राजीनामे सादर केले होते.. बेलापूरमधून गणेश नाईक यांना उमेदवारी दिल्यास प्रचार करणार नाही, असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला होता. मात्र बेलापूरमधून नाईक यांनाच डच्चू मिळाल्याने सेनेतील बंड थंबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे असले तरी सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत नाईक काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसManda Mhatreमंदा म्हात्रे