वाशी गावात अनधिकृत मोबाइल टॉवरवर कारवाई
By Admin | Updated: August 13, 2015 00:24 IST2015-08-13T00:24:01+5:302015-08-13T00:24:01+5:30
वाशी गावामधील अनधिकृत मोबाइल टॉवरवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली. अतिक्रमण विभागाची ही मोहीम सुरू ठेवली जाणार आहे.

वाशी गावात अनधिकृत मोबाइल टॉवरवर कारवाई
नवी मुंबई : वाशी गावामधील अनधिकृत मोबाइल टॉवरवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली. अतिक्रमण विभागाची ही मोहीम सुरू ठेवली जाणार आहे.
येथील ओमकार निवास इमारतीवर रिलायन्स कंपनीचा टॉवर बसविण्यात आला होता. सदर टॉवरसाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आली नव्हती. याविषयी नागरिकांनी पालिकेकडे तक्रार केली होती.
वाशी विभाग कार्यालयाच्यावतीने बुधवारी सदर टॉवर हटविण्यात आला. शहरात इतर ठिकाणी असलेले अनधिकृत टॉवर व इतर अतिक्रमणावरही कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई विभाग अधिकारी राजेंद्र चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तात्यासाहेब गायकवाड, हरिश्चंद्र भोईर यांच्या पथकाने केली.
(प्रतिनिधी)