शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या दोन लाचखोर अधिकाऱ्यांवर कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 19:31 IST

प्रितमसिंग भरतसिंग राजपूत व विकास किसन खडसे अशी कारवाई झालेल्या सिडकोच्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

नवी मुंबई : अनधिकृत बांधकामावरील कारवाई टाळण्यासाठी दहा लाखाची मागणी करणारया सिडकोच्या दोन अधिकाऱ्यांवर  कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात सिबीडी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचेच्या दहा लाखापैकी अडिच लाख रुपये खासगी व्यक्तीमार्फत स्विकारताना सापळा रचून नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने हि कारवाई केली.

प्रितमसिंग भरतसिंग राजपूत व विकास किसन खडसे अशी कारवाई झालेल्या सिडकोच्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. दोघेही अनधिकृत बांधकाम विभागात कार्यरत असून राजपुतकडे विकास अधिकारी तर खडसेकडे भुमापक नियंत्रक पदाचा कार्यभार आहे.  त्यांच्याविरोधात रबाडा येथील व्यक्तीने नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांनी राहत्या घराच्या पुर्नबांधणीचे काम सुरु केले होते. मात्र सदर काम विनापरवाना होत असल्याने त्यावर सिडको मार्फत कारवाईचा इशारा खडसे यांनी दिला होता. तर कारवाई टाळायची असल्यास दहा लाख रुपयांची मागणी केली होती.

तडजोडी अंती त्यांनी 8 लाख रुपये घेण्याचे मान्य केले होते. त्यापैकी अडिच लाख रुपये सोमवारी मागीतले होते. सिबीडी येथील रायगड भवण इमारतीच्या कॅन्टीन मध्ये हि रक्कम स्विकारली जाणार होती. त्यानुसार दुपारी चार वाजण्याच्या सुमारास लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे उपअधिक्षक रमेश चव्हाण यांच्या पथकाने त्याठिकाणी सापळा रचला होता. यावेळी कॅन्टीनचा कर्मचारी प्रदिप पाटील याच्या मार्फत हि रक्कम स्विकारली जाताच कारवाई करण्यात आली. चौकशीत खडसे व राजपुत यांची नावे समोर येताच त्यांच्यावरही कारवाई करुन सिबीडी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. 

सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडून होत असलेल्या कारवायांमध्ये मोठय़ा प्रमाणात अपारदर्शकता व अर्थकारण असल्याचे आरोप यापुर्वी देखिल शहरातील नागरीकांकडून होत होते. मात्र तक्रारी अभावी त्यांना वाचा फुटत नव्हती. अखेर रबाळे येथील प्रकरणावरुन कारवाईचा धाक दाखवून पैसे उकळले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये इतरही प्रकरणे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई