शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील सात सरपंचांसह एक उपसरपंच अपात्र घोषित, कोकण आयुक्त विलास पाटील यांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 12:36 IST

Sarpanch: कोकण विभागातील ७ सरपंच, १ उपसरपंच आणि एका सदस्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार अपात्रतेची कारवाई केली आहे. गैरव्यवहार प्रकरणातील तक्रारीत दोषी आढळल्याने त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले आहे.

नवी मुंबई :  कोकण विभागातील ७ सरपंच, १ उपसरपंच आणि एका सदस्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार अपात्रतेची कारवाई केली आहे. गैरव्यवहार प्रकरणातील तक्रारीत दोषी आढळल्याने त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले आहे. कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी ही कारवाई केली असून मागील काही दिवसांतील अशाप्रकारची ही दुसरी कारवाई आहे.

कोकण विभागांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्यांमार्फत होणारे गैरवर्तन, गैरव्यवहारांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषदेने अहवाल सादर केला होता. यात ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदूर्ग या पाच जिल्ह्यांतील एकूण ३५ सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांविरोधातील तक्रारींचा समावेश होता. त्यानुसार पाटील यांनी १५  फेब्रुवारी २०२० रोजी सुनावणी घेतल्या होत्या. यापैकी १६ प्रकरणांवर निर्णय घेतला आहे. तर उर्वरित १० प्रकरणांचा फेरअहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. हा फेरअहवाल सादर आल्यानंतर अपात्रतेची कारवाई केली आहे.

गटविकास अधिकाऱ्यांना निर्देशग्रामपंचायतींमध्ये अशा प्रकारचा गैरव्यवहार होणे गंभीर बाब आहे. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यादृष्टीने संबंधित विभागाने ठोस नियोजन करण्याची गरज असून त्यानुसार गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, अशा सूचना विलास पाटील यांनी केल्या आहेत.

 हे सरपंच झाले अपात्र सिंधुदूर्ग जिल्हयातील ग्रा.पं. पेंडूर- वेंगुर्ला, रायगड जिल्ह्यातील ग्रा.पं. रासळ-सुधागड पाली, ग्रा.पं. वावंढळ खालापूर, ग्रा.पं. तळवली तर्फे अष्टमी-रोहा येथील सरपंच यांना त्यांच्या सरपंच तसेच सदस्य पदावरूनही दूर केले आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ग्रा.पं. उसप- दोडामार्ग, ग्रा.पं. कळसुली-कणकवली व ठाणे जिल्ह्यातील ग्रा.पं.नांदप-कल्याण येथील सरपंचांना त्यांचे सरपंच पदावरून दूर केले आहे. परंतु,  त्यांचे सदस्यत्व पद कायम ठेवले आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ग्रा.पं. कडावल- कुडाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंचाला त्यांच्या पदावरून दूर करून त्यांचे सदस्य पद कायम ठेवलेले आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील रहाटोली ग्रामपंचायतीच्या एका सदस्याला पदावरून काढून टाकले आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील वेळास्ते गावच्या सरपंचाच्या विरुद्ध दाखल केलेला अर्ज फेटाळला आहे.

टॅग्स :sarpanchसरपंचkonkanकोकण