शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: October 6, 2016 03:56 IST

पनवेल शहर महानगरपालिका क्षेत्राला स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बनविण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आश्रय देणार नसल्याचे पनवेल शहर

पनवेल : पनवेल शहर महानगरपालिका क्षेत्राला स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बनविण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आश्रय देणार नसल्याचे पनवेल शहर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी पनवेल शहर महानगरपालिकेत बुधवारी आयोजित के लेल्यापत्रकार परिषदेत सांगितले.कामात दिरंगाई केल्याप्रकरणी आरोग्य विभागातील सुरेश भालेराव या कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. पनवेलमधील प्रभाग क्र मांक ७ मधील कोळीवाडा परिसरात अंगणवाडीसमोर मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असल्यामुळे स्वच्छता विभागात मुकादम म्हणून कार्यरत असताना आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार न पाडल्यामुळे हे निलंबन करण्यात आले असल्याचे पालिका आयुक्त शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. शनिवारी १ आॅक्टोबर रोजी आयुक्तांनी उशिरा आयुक्तपदाचा पदभार सांभाळल्यानंतर सोमवारपासून उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामात शिस्त येण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी ५९ , मंगळवारी ५९ तर बुधवारी ४९ स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करीत या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात केले. विशेष म्हणजे वर्ग ३ श्रेणीतील ५१ कर्मचाऱ्यांचा देखील एका दिवसाचा पगार कपात करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. यापूर्वी तत्कालीन नगरपरिषदेत एवढी मोठी कारवाई झाली नसल्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह अधिकारी वर्गाने देखील धसका घेतला आहे. पनवेल शहर महानगरपालिकेतील नागरिकांना चांगल्या सोयी - सुविधा देण्यासाठी आम्ही कार्यतत्पर राहणार असून नागरिकांनी शहरातील समस्यांसंदर्भात थेट आयुक्तांशी संपर्कसाधण्याचे आवाहन यावेळी आयुक्त सुधाकर शिंदे यांनी केले. पत्रकार परिषदेसाठी महापालिकेचे अधिकारी भगवान गाडे, कनिष्ठ अभियंता संजय कटेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)