वाशी खाडीपुलावर दोन ट्रेलरचा अपघात; मानखुर्दपर्यंत चक्काजाम, प्रवाशांची गैरसोय 

By नामदेव मोरे | Updated: June 26, 2023 09:11 IST2023-06-26T09:11:37+5:302023-06-26T09:11:56+5:30

पावसामुळे खाडीपुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे व ब्रेक न लागल्याने दोन ट्रेलरचा अपघात झाला.

Accident of two trailers on Vashi Khadi Bridge, in Navi Mumbai; Traffic jam till Mankhurd, inconvenience to passengers | वाशी खाडीपुलावर दोन ट्रेलरचा अपघात; मानखुर्दपर्यंत चक्काजाम, प्रवाशांची गैरसोय 

वाशी खाडीपुलावर दोन ट्रेलरचा अपघात; मानखुर्दपर्यंत चक्काजाम, प्रवाशांची गैरसोय 

नवी मुंबई: सायन पनवेल महामार्गावर सोमवारी सकाळी साडेसात वाजता दोन ट्रेलरचा अपघात झाला. यामुळे पुणेकडे जाणाऱ्या मार्गीकेवर चक्काजाम झाले होते. मानखुर्द पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

पावसामुळे खाडीपुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे व ब्रेक न लागल्याने दोन ट्रेलरचा अपघात झाला. पुलावरच दोन्ही वाहने बंद झाल्याने पुणेकडे जाणा-या मार्गीकेवर वाहतूक कोंडी झाली. वाशी वाहतूक शाखेच्या कर्मचा-यांनी तत्काळ उपाययोजना सुरू केल्या. काही वाहतूक जुन्या खाडीपुलावरून वळविण्यात आली. जवळपास एक तास वाहतूक विस्कळीत झाली होती. 

सकाळी मानखुर्दवरून विद्यार्थ्यांना नवी मुंबईत घेऊन येणाऱ्या स्कूल बसही वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. चक्काजाम मध्ये फसलेल्या दोन रूग्णवाहिकांना उलट बाजूने मार्ग काढून देण्यात आला. वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक सतीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Accident of two trailers on Vashi Khadi Bridge, in Navi Mumbai; Traffic jam till Mankhurd, inconvenience to passengers