सुरक्षारक्षकाच्या बुटात लपला होता तीन फुटांचा कोब्रा ! लक्षात आल्याने अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 09:17 IST2025-07-19T09:17:05+5:302025-07-19T09:17:27+5:30

टीसीसी औद्योगिक वसाहतीतील महापे येथे एका खासगी कंपनीतील सुरक्षारक्षकाने पाऊस असल्याने बूट बाहेर काढून ठेवले होते. काही वेळानंतर तो बूट पुन्हा घालण्यासाठी केला असता त्याला बुटात काही तरी हालचाल जाणवली.

A three-foot cobra was hidden in a security guard's shoe! Incident in a private company, disaster averted after being noticed | सुरक्षारक्षकाच्या बुटात लपला होता तीन फुटांचा कोब्रा ! लक्षात आल्याने अनर्थ टळला

सुरक्षारक्षकाच्या बुटात लपला होता तीन फुटांचा कोब्रा ! लक्षात आल्याने अनर्थ टळला

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पाऊस असल्याने खासगी कंपनीतील सुरक्षारक्षकाने आपले बूट काढून ठेवले होते, काही वेळानंतर तो बूट घालायला गेला खरा, पण... बुटात लपलेला साप पाहून तो पुरता हादरला. त्यानंतर सर्पमित्राला बोलावण्यात आले. त्याने सापाला बाहेर काढल्यानंतर तो कोब्रा जातीचा चष्माधारी तीन फुटी नाग होता. त्याला पाहून कंपनीतील सर्व जण आवाक झाले. वेळीच लक्षात आल्याने अनर्थ टळला.   

टीसीसी औद्योगिक वसाहतीतील महापे येथे एका खासगी कंपनीतील सुरक्षारक्षकाने पाऊस असल्याने बूट बाहेर काढून ठेवले होते. काही वेळानंतर तो बूट पुन्हा घालण्यासाठी केला असता त्याला बुटात काही तरी हालचाल जाणवली. बुटाच्या आत पाहिले असता साप असल्याचे लक्षात आले. त्यानंतर सर्पमित्र अक्षय डांगे यांना बोलावण्यात आले. त्यांनी शिताफीने बुटात लपलेल्या नागाला बाहेर काढले आणि नंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.  

‘बुट घालताना काळजी घ्या’
बाहेर पाऊस असल्याने सापासारखे सरपटणारे प्राणी सुरक्षेसाठी उष्ण आणि कोरडी जागा शोधत  असतात. 
याच कारणास्तव या चष्माधारी कोब्राने बुटांमध्ये आसरा घेतलेला असावा, असे डांगे यांनी सांगितले आहे. 

Web Title: A three-foot cobra was hidden in a security guard's shoe! Incident in a private company, disaster averted after being noticed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :snakeसाप