सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई ऑनलाइन ट्रेडिंगच्या मोहात पाडून गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये हडपणाऱ्या टोळीचे बनावट कॉल सेंटर नवी मुंबईपोलिसांनी उद्ध्वस्त केले. यात जवळपास शंभर तरुण-तरुणी काम करत होते. त्यात अपवादात्मक तरुण वगळता सर्वांना तिथल्या फसव्या कामाची कल्पना होती. यामुळेच त्यांना मागतील तेवढ्या पगारावर नियुक्त केले होते. मात्र, हे काम करताना ना कोणते ऑफर लेटर होते, ना इतर कोणती कागदोपत्री प्रक्रिया. त्यामुळे स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करून गुन्हेगारांना साथ दिल्याने शंभर कामगारही कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.
बॉलिवूडमधल्या ‘स्पेशल २६’ या चित्रपटातल्या कथेप्रमाणे महापे येथे चालणारे बनावट कॉल सेंटर नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने उघडकीस आणले. त्याठिकाणी काहीतरी गौडबंगाल सुरू असल्याची टीप सायबर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सायबर सेलच्या पथकाने रेकी करून मागील आठवड्यात रात्री तिथे छापा टाकला. यावेळी जवळपास शंभर तरुण-तरुणी काम करताना आढळले.
मुलाखतीला येणाऱ्यांची परिस्थिती-मानसिकता हेरून उमेदवारांनी अपेक्षित पगाराचा अंदाजे टाकलेला खडा बिनशर्त मान्य करून त्यांना नोकरीवर घेतले होते. त्या सर्वांना गुन्ह्यात सहआरोपी किंवा साक्षीदार केले जाण्याची शक्यता आहे.
मुख्य सूत्रधार असलेल्या तिघांपैकी अक्षय शिर्के याने यापूर्वी एका कॉल सेंटरमध्ये काम केले होते. यामुळे कामकाजाची पद्धत माहिती असल्याने त्याने इतर दोन साथीदारांच्या मदतीने बनावट कॉल सेंटर सुरू करून लोकांना गंडवण्याचा मार्ग निवडला होता.
एकाने वेळीच सोडली साथ
अक्षयने अगोदर एका व्यक्तीसोबत मिळून कॉल सेंटर सुरू केले होते. मात्र, त्या व्यक्तीला संशय आल्याने त्याने भागीदारीतून मुक्त होऊन साथ सोडली होती. यानंतर इतरांना सोबत घेऊन हे कॉल सेंटर सुरू ठेवले.
फसवणुकीचा आकडा कोटीत
कॉल सेंटरमधून अद्यापपर्यंत १२ कोटींची फसवणूक झाल्याचे गुन्ह्यासाठी वापरलेल्या बँक खात्यातून उघडकीस आले आहे. मात्र, हा आकडा आणखी वाढू शकतो.
११ महिन्यांत ३०५ गुन्हे
नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात ट्रेडिंगच्या बहाण्याने किंवा इतर आमिषाने ऑनलाइन फसवणुकीचे ३०५ गुन्हे दाखल आहेत. त्यात गळाला लागलेल्या व्यक्तीचे १५० कोटींहून अधिक रुपये हडपले.
Web Summary : Navi Mumbai police busted a fake call center scamming investors in online trading. Hundreds were hired, aware of the fraud, lured by high salaries without formal contracts. They face legal consequences for enabling the crime. Crores defrauded, 305 cases, ₹150+ crore lost in Navi Mumbai.
Web Summary : नवी मुंबई पुलिस ने ऑनलाइन ट्रेडिंग में निवेशकों को धोखा देने वाले एक फर्जी कॉल सेंटर का भंडाफोड़ किया। सैकड़ों लोगों को उच्च वेतन के लालच में काम पर रखा गया, जिन्हें धोखाधड़ी की जानकारी थी, बिना औपचारिक अनुबंध के। उन्हें अपराध को सक्षम करने के लिए कानूनी परिणाम भुगतने होंगे। करोड़ों की धोखाधड़ी, नवी मुंबई में 305 मामले, ₹150+ करोड़ का नुकसान।