तळोजात भंगार गोदामाला भीषण आग; संपूर्ण गोदाम भस्मसात, कोणतीही जीवितहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2022 13:25 IST2022-06-17T13:20:06+5:302022-06-17T13:25:02+5:30
चार तासांच्या अथक प्रयत्न करत आग नियंत्रणात

तळोजात भंगार गोदामाला भीषण आग; संपूर्ण गोदाम भस्मसात, कोणतीही जीवितहानी नाही
नवी मुंबई- तळोजा एमआयडीसीमध्ये असलेल्या भंगार गोदामाला भीषण आग लागली होती. मध्यरात्री सुमारास लागलेल्या आगीवर चार तासांनंतर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.आग इतकी मोठी होती की ती विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले,आगीचे लोळ इतके मोठे होते की संपूर्ण परिसर प्रकाशमय झाले होते.
आता आग विझली असली तरी मोठे नुकसान या ठिकाणी झाले आहे. लाकूड,प्लॅस्टीक आणि इतर साहित्यांची भंगार दुकानांना ही आग लागली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे भंगार सामान असल्याने आगीने मोठा पेट घेतला होता. मात्र सुदैवाने या मध्ये कुणीही जखमी झाले नसून जीवितहानी झालेली नाही.