व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट भोवली; महापुरुषांचा अपमान करणारा मजकूर आंगलट
By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 3, 2023 18:45 IST2023-04-03T18:45:21+5:302023-04-03T18:45:38+5:30
व्हॉट्सअॅप ग्रुपवर महापुरुषांचा अपमान करणारी पोस्ट टाकल्याबद्दल व्हाट्सअप ग्रुपवरील एका सदस्यासह ती पोस्ट शेअर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट भोवली; महापुरुषांचा अपमान करणारा मजकूर आंगलट
नवी मुंबई: व्हॉट्सअॅप ग्रुपवर महापुरुषांचा अपमान करणारी पोस्ट टाकल्याबद्दल व्हाट्सअप ग्रुपवरील एका सदस्यासह ती पोस्ट शेअर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. एका ग्रुप सदस्याने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरून एनआरआय पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
सीवूड परिसरातील काही व्यवसायिक व व्यक्तींच्या व्हाट्सअप ग्रुपवर हा प्रकार घडला आहे. दोन दिवसांपूर्वी या ग्रुपवर एका सदस्याने महापुरुषांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. तर काही सदस्यांनी ती शेअर देखील केली होती. मात्र या पोस्टमुळे धार्मिक तेढ होत असल्याने व महापुरुषांना मानणाऱ्यांच्या भावना दुखावत असल्याने ग्रुप मधील एका सदस्याने याबाबत एनआरआय पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याद्वारे रविवारी रात्री पोस्ट टाकणाऱ्या सदस्यासह ती पोस्ट शेअर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस अधिक तपास करत आहेत.