हळदीतील ९० जणांची होणार कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 02:38 IST2020-06-27T02:37:47+5:302020-06-27T02:38:00+5:30
२३ जून रोजी नवऱ्या मुलाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या ९० जणांची चाचणी करण्यात येणार आहे.

हळदीतील ९० जणांची होणार कोरोना चाचणी
नवीन पनवेल : १४ जून रोजी नेरे गावातील पाटील कुटुंबाने मुलाच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम केला होता. त्यानंतर २३ जून रोजी नवऱ्या मुलाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या ९० जणांची चाचणी करण्यात येणार आहे. तर नेरे परिसर कंटेमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या टप्यात नव्वदपैकी २७ जणांची चाचणी करण्यात आली आहे. उवर्रीत लोकांची होणार आहे. दरम्यान २५ जून रोजी पनवेलचे प्रांत दत्तात्रेय नवले, तहसीलदार अमित सानप आदींनी येथील परिसराची पाहणी केली. परिसरात कोणीही विनापरवाना लग्नसोहळ्यांचे आयोजन करू नये, अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. लग्नासाठी तहसील कार्यालयातून परवानगी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.