शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
2
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
3
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
4
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
5
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
6
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
7
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
8
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
9
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
10
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
11
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
12
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
13
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
14
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
15
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
16
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
17
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
18
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
19
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
20
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
Daily Top 2Weekly Top 5

'शासन आपल्या दारी'चा ८५० दिघावासीयांनी घेतला लाभ

By नारायण जाधव | Updated: January 20, 2024 19:15 IST

पहिल्याच दिवशी दिघा विभागातील सकाळच्या सत्रात ३०० हून अधिक तर दुपारच्या सत्रात ५५० हून अधिक नागरिकांनी 'शासन आपल्या दारी' उपक्रमाचा लाभ घेतला.

नवी मुंबई: योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी' हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'शासन आपल्या दारी' उपक्रमाचा नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शुभारंभ आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दिघा तलावानजीकच्या पटांगणात नागरिकांच्या उपस्थितीत झाला. शासनाच्या योजनांप्रमाणेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या लोककल्याणकारी योजनांचेही माहितीप्रद स्टॉल या ठिकाणी लावले असून त्यांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. पहिल्याच दिवशी दिघा विभागातील सकाळच्या सत्रात ३०० हून अधिक तर दुपारच्या सत्रात ५५० हून अधिक नागरिकांनी 'शासन आपल्या दारी' उपक्रमाचा लाभ घेतला. काहीजणांनी शासनाच्या व महानगरपालिकेच्या योजनांची माहिती घेतली. तर अनेकांनी अर्ज भरून योजनांचा लाभही घेतला.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या समवेत समाजविकास विभागाचे उपायुक्त किसन पलांडे, परिमंडळ २ चे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार, मुख्यमंत्री जनकल्याण योजनेचे शासकीय अधिकारी सुनील आव्हाड, दिघा विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. कैलास गायकवाड, वैद्यकिय अधिकारी डॉ. उज्वला ओतुरकर, ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक अहिरे, समाजविकास अधिकारी सर्जेराव परांडे तसेच माजी नगरसेवक नवीन गवते, ॲड. अपर्णा गवते, दीपा गवते आणि वीरेंद्र सिंग व श्री सुरेश पाल उपस्थित होते. कार्यक्रमात दिघा विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांच्यासह सर्व उपस्थितांनी माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची सामुहिक शपथ ग्रहण करून आभार प्रदर्शन केले. हा उपक्रम ऐरोली विभागात २३ जानेवारी रोजी, सकाळी ११ ते १ या वेळेत ऐरोली विभाग कार्यालय तसेच दुपारी २ ते ५ या वेळेत नमुंमपा शाळा क्रमांक ५३, चिंचपाडा, ऐरोली या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे २४ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत नमुंमपा शाळा क्रमांक ४८, दिवा, ऐरोली (काचेची शाळा) येथे त्याचप्रमाणे दुपारी २ ते ५ या वेळेत सेक्टर १५, ऐरोली येथे आर. आर. पाटील मैदान येथे होणार आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई