शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

सिडकोची शिल्लक ७६ घरे विक्रीसाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 2:56 AM

दहा हजार घरांची यशस्वी सोडत काढल्यानंतर सिडकोने आता जुन्या गृहप्रकल्पातील शिल्लक राहिलेली आणखी ७६ घरे विक्रीसाठी काढली आहेत.

नवी मुंबई  - दहा हजार घरांची यशस्वी सोडत काढल्यानंतर सिडकोने आता जुन्या गृहप्रकल्पातील शिल्लक राहिलेली आणखी ७६ घरे विक्रीसाठी काढली आहेत. यात वास्तुविहार सेलिब्रेशन आणि उन्नत्ती या गृहप्रकल्पातील शिल्लक घरांचा समावेश आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या गुरूवारी या घरांच्या नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला.मागेल त्याला घर या धोरणांनुसार सिडकोने येत्या काळात सुमारे दोन लाख घरे बांधण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. त्यापैकी ९ हजार घरांच्या प्रकल्पाचा शुभारंभही करण्यात आला आहे. नवीन घरे बांधतानाच जुन्या शिल्लक राहिलेल्या घरांचा निपटारा करण्यावर सिडकोने भर दिला आहे. सिडकोने आगामी काळात विविध आर्थिक घटकांसाठी जवळपास दोन लाख घरे बांधण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.त्यातील ९५ हजार घरांच्या महत्वकांक्षी योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या टप्यातील ९२४९ घरांच्या विक्रीसाठी सप्टेंबर २0१९ मध्ये आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्याचबरोबर स्वप्नपूर्ती या जुन्या गृहप्रकल्पातील शिल्लक ८१0 घरांसाठी सुध्दा अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज सादर करण्यासाठी ५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या दोन्ही गृहप्रकल्पातील दहा हजार घरांसाठी जवळपास एक लाख अर्ज सिडकोला प्राप्त झाले होते. त्याची संगणकीय सोडत मंगळवारी काढण्यात आली. त्यानंतर लगेच वास्तुविहार सेलिब्रेशन आणि उन्नत्ती गृहप्रकल्पातील ७६ सदनिकांची गुरूवारपासून आॅनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.घरांची नोंदणी आणि सोडत आॅनलाईन पध्दतीने होत असल्याने त्यात पारदर्शकता आली आहे. या आॅनलाईन प्रणालीचे राज्य सरकारने सुध्दा प्रशंसा केल्याची माहिती लोकेश चंद्र यांनी यावेळी दिली. तसेच नवी मुंबईत घर घेवू इच्छीणाऱ्यांना येत्या काळ घर घेण्याच्या अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचे सुध्दा त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या प्रसंगी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रशांत नारनवरे, सहव्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे व संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.७६ सदनिकांचा तपशीलनोंदणीसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या ७६ सदनिकांपैकी वास्तुविहार सेलिब्रेशन गृहप्रकल्पात ४५ तर उन्नत्ती गृहप्रकल्पातील ३१ घरे आहेत. वास्तुविहार सेलिब्रेशन गृहप्रकल्पात वन रूम किचन, वन बीएचके आणि टू बिएचके तर उन्नती गृहप्रकल्पात १ आरके व १ बीएचके घरांचा समावेश आहे. वास्तुविहार सेलिब्रेशन हा गृहप्रकल्प खारघरच्या निसर्गरम्य परिसरात तर उन्नती गृहप्रकल्प नव्याने विकसीत होत असलेल्या उलवे नोडमध्ये आहे.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई