शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

नवी मुंबईतील ६३२ वृक्षराजींची होणार कत्तल; ८४ झाडांचे पुनर्रोपण 

By नारायण जाधव | Updated: July 12, 2023 18:48 IST

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील तुर्भे एमआयडीसी आणि पाच बीच परिसरातील दोन प्रकल्पांसाठी ६३२ झाडांचा बळी जाणार आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील तुर्भे एमआयडीसी आणि पाच बीच परिसरातील दोन प्रकल्पांसाठी ६३२ झाडांचा बळी जाणार आहे. तर ८४ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक झाडांचा बळी ‘एचपीसीएल’ अर्थात हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन घेणार आहे. ‘एचपीसीएल’ त्यांच्या टीटीसीत टीटी १ टर्मिनलच्या विकासासाठी ४५० झाडांची कत्तल करणार असून, ५२ झाडांचे पुनर्रोपण करणार आहे. तर नवी मुंबई महापालिका तिच्या बहुप्रतिक्षित पाच बीच मार्गावरील सानपाडा येथील भुयारी मार्गासाठी १९२ झाडांचा बळी घेणार आहे. याशिवाय ३२ झाडांचे पुनर्रोपण करणार आहे.

याबाबत एमआयडीसीने ‘एचपीसीएल’चा तर नवी मुंबई महापालिकेने पाच बीच मार्गावरील भुयारी मार्गासाठी वृक्षतोडीचा प्रस्ताव राज्य वृक्ष प्राधिकरण समितीकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्याला वृक्ष प्राधिकरण समितीने आपल्या सातव्या बैठकीत मंजुरी दिली आहे. वृक्षकत्तलीस मंजुरी मिळाल्यामुळे दोन्ही प्रकल्पांच्या बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात भरदार वृक्षांचा बळी जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींत नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

भरपाईच्या वृक्षलागवडीसाठी जागा नाहीएचपीसीएल त्यांच्या टीटीसीत टीटी १ टर्मिनलसाठी ज्या झाडांचा बळी घेणार आहे, त्यांचे सरासरी आयुष्यमान ५०६४ वर्षे आहे. यामुळे त्या बदल्यात तेवढीच वृक्षलागवड त्यांना करावी लागणार आहे. यात ज्या जातीच्या वृक्षांचा बळी जाणार आहे, तीच लागवड एचपीसीएलला करावी लागणार आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेली १.३ हेक्टर जागा एचपीसीएलने सुचविलेली आहे, ती पुरेशी नाही, असे निरीक्षण राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने नोंदविले आहे. यामुळे त्यांनी पुरेशी जागा शोधून तिचे ताबा पत्र राज्य वृक्ष प्राधिकरण समितीला सादर करायचे आहे.

पाम बीच भुयारी मार्गात १९२ झाडांचा बळीपाम बीच मार्गावर सानपाड्यात सेक्टर १९ येथे केशर सॉलिटायरजवळ नवी मुंबई महापालिका जो आरसीसी बॉक्स टाइप हा भुयारी मार्ग ३० हजार ३०० मीटर क्षेत्रावर बांधणार आहे. त्यासाठी ९२ झाडांची कत्तल करावी लागणार असून, ३२ झाडांचे पुनर्रोपण करावे लागणार आहे. या झाडांचे सरासरी आयुष्यमान ६०६३ वर्षे आहे. यामुळे त्या बदल्यात तेवढ्या प्रमाणात स्थानिक वृक्षांची लागवड करण्याचे बंधन महापालिकेस वृक्ष प्राधिकरण समितीने घातले आहे.

वृक्ष प्राधिकरण समिती म्हणजे रबर स्टॅम्पमहाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरण समिती म्हणजे वृक्ष कत्तलीचे एक हत्यारच बनली आहे. ही समिती फक्त वृक्षतोडीसच परवानगी देते. कधीही पर्याय सुचवित आहे. शिवाय विविध वृक्षतोडीसाठी जे प्रस्ताव पाठवितात, ते कितपत योग्य आहेत, तेवढी वृक्षतोड आवश्यक आहे की नाही, बरे जेवढ्या वृक्षतोडीस परवानगी दिली आहे, तितकीच होते की जास्त होते, हे पाहायलाही त्यांचे सदस्य कधी स्थळ पाहणी करीत नाहीत. यामुळे खरे सांगायचे झाल्यास वृक्ष प्राधिकरण समिती म्हणजे रबर स्टॅम्प झाली आहे. - सुनील अगरवाल, पर्यावरणप्रेमी, नवी मुंबई.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई