शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मुंबई बाजार समितीत ५०० टन कांदा पडून!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 05:41 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होऊ लागल्याने बाजारभावाची घसरण सुरू आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होऊ लागल्याने बाजारभावाची घसरण सुरू आहे. ५०० टनांपेक्षा जास्त माल विक्री न झाल्यामुळे पडून आहे. चार दिवसांमध्ये जवळपास पाच टन माल सडला असून, मार्केटमध्ये दुर्गंधी पसरली आहे.बाजारभाव घसरल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. नवीन कांदा मार्केटमध्ये आल्यामुळे उन्हाळी कांद्याचे भाव पडले आहेत. मुंबईमध्ये गुरुवारी ७० ट्रक व ५१ टेम्पो मिळून १२१ वाहनांमधून १३४४ टन मालाची आवक झाली आहे. बुधवारी १७४६ टन आवक झाली होती. मागणीपेक्षा आवक जास्त झाली असून माल ठेवायचा कुठे? असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. सर्व गोडाऊन भरली आहेत. मोकळ्या पॅसेजमध्येही शेकडो गोणींची थप्पी लावण्यात आली आहेत. लिलावगृहामध्येही पाय ठेवण्यास जागा नाही एवढा माल ठेवण्यात आला आहे. होलसेल मार्केटमध्ये ६ ते १२ रुपये किलो दराने विक्री होऊ लागली असून खराब झालेला माल ३ ते ५ रुपयांनाही विकला जात आहे. ग्राहकांनीही पाठ फिरवली असल्यामुळे विक्रीसाठी आलेल्या मालाचे करायचे काय? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.बाजार समितीमध्ये चार दिवसांमध्ये जवळपास पाच टन माल सडला आहे. लिलावगृहामध्ये गोणीमधून पाणी येऊ लागले असून सर्वत्र दुर्गंधी पसरू लागली आहे. शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सडलेला माल मार्केटबाहेर काढण्यासाठीही प्रत्येक गोणीला दहा रुपये खर्च होऊ लागला आहे. कांदा मार्केटमधील व्यापारी सुरेश शिंदे यांनी सांगितले की आवक प्रचंड होऊ लागल्यामुळे सर्व मालाची विक्री होत नाही. विक्री न झाल्यामुळे माल खराब होण्याचे प्रमाण वाढत असून आवक नियंत्रणामध्ये येईपर्यंत अशी स्थिती होणार आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढल्याने दररोज १२१ ट्रक व टेम्पो भरुन कांद्याची आवक होत आहे. या कांद्याचे वजन सुमारे १३४४ इतके असते. मात्र, ग्राहकांनी पाठ फिरवल्याने कांदा गोदामात आणि बाहेर पडून आहे. मोठ्या प्रमाणात कांदा पडून राहिल्याने कुजत चालला आहे. त्यामुळेच तो ६ ते १२रुपये प्रतिकिलो दराने विकावा लागत असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.>राज्यातील प्रमुख मार्केटमधील आवकमार्केट आवक (टन) दर (प्रतिकिलो)मुंबई १३४४ ०६ ते १२कोल्हापूर ०४५२ ०४ ते १२अहमदनगर ३६९७ ०१ ते ११चांदवड ११०० ०२ ते १०उमराणे १७५० ०४ ते ११पुणे १०४७ ०४ ते १२पिंपळगाव २२४८ ०२ ते १२

टॅग्स :onionकांदा