शहरात स्वाइनचे ५ रुग्ण

By Admin | Updated: July 8, 2017 06:06 IST2017-07-08T06:06:47+5:302017-07-08T06:06:47+5:30

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एप्रिलपासून एकूण ३३ संशयित रु ग्ण आढळून आले. त्यापैकी ५ रुग्ण रुग्णालयांत

5 cases of swine in the city | शहरात स्वाइनचे ५ रुग्ण

शहरात स्वाइनचे ५ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एप्रिलपासून एकूण ३३ संशयित रु ग्ण आढळून आले. त्यापैकी ५ रुग्ण रुग्णालयांत उपचार घेत असून, त्यांची प्रकृती उपचारायोग्य आहे. या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील ३८ व्यक्तींचीही तपासणी करून आवश्यक उपचार करण्यात आले आहेत.
संशयित रुग्णांपैकी १९ रु ग्णांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १२ रु ग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या १२ पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उचित उपचार करण्यात आले असून, यापैकी ७ रुग्ण पूर्णत: बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत कार्यान्वित असलेली वाशी, ऐरोली व नेरुळ येथील रुग्णालये, बेलापूर येथील माता बाल रुग्णालय, सर्व नागरी आरोग्य केंद्रे यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सभा घेऊन त्यांना स्वाइन फ्लू आजाराबाबत तांत्रिक मार्गदर्शन देण्यात आले. त्याचप्रमाणे नागरी आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे याबाबत विशेष प्रशिक्षण घेण्यात आले आहे. प्रशिक्षणामध्ये स्क्रिनिंग सेंटरमध्ये जास्तीत जास्त संशयित रु ग्णांचा शोध घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश आरोग्य विभागामार्फत देण्यात आले आहेत.
महानगरपालिकेकडे यासाठीचा आवश्यक औषधसाठा व उपकरणे उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागाचे डॉ. दीपक परोपकारी यांनी दिली. सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे ८ आणि डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय नेरु ळ येथे ५ खाटांचा स्वतंत्र कक्ष संशयित स्वाइन फ्ल्यू रुग्ण उपचारासाठी सुरू करण्यात आला आहे.

शाळेतील मुख्याध्यापकांनाही दिले प्रशिक्षण
महापालिका कार्यक्षेत्रातील खासगी, वैद्यकीय, व्यावसायिक व महानगरपालिकेच्या शाळांतील सर्व मुख्याध्यापक यांचेही मुख्यालय स्तरावर प्रशिक्षण घेण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये यांचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांना स्वाइन फ्लूच्या अनुषंगाने शाळा, महाविद्यालयांमध्ये घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करणारे परिपत्रक देण्यात आले आहे. नागरिकांमध्ये स्वाइन फ्लू आजाराबाबत प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती पोहोचावी, याकरिता वर्तमानपत्रे, सोशल मीडियाद्वारे सातत्यपूर्ण आवाहन करण्यात येत आहे. तसेच जनमाहितीपर दोन लाखांहून अधिक हस्तपत्रके वितरित करण्यात आली आहेत. शहरातील महत्त्वाच्याठिकाणी पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

Web Title: 5 cases of swine in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.