नवी मुंबईत ४,७०१ कोविड बेड्स शिल्लक; पालिका सतर्क, नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 00:50 IST2020-12-02T00:49:26+5:302020-12-02T00:50:15+5:30
शहरात मार्च महिन्यात कोरोना पसरू लागल्यानंतर पुढील काही दिवसांत भयावह चित्र उभे राहिले होते. गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयात बेड मिळत नव्हते.

नवी मुंबईत ४,७०१ कोविड बेड्स शिल्लक; पालिका सतर्क, नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : कोरोना रुग्णांचा आलेख पुन्हा एकदा वाढू लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्याने नागरिकांनाही खबरदारीच्या सूचना केल्या जात आहेत. दरम्यान, कोरोनाची लाट आल्यास पुरेसे बेड्स व व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
शहरात मार्च महिन्यात कोरोना पसरू लागल्यानंतर पुढील काही दिवसांत भयावह चित्र उभे राहिले होते. गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयात बेड मिळत नव्हते. यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. मात्र, कोरोनाची दुसरी लाट आल्यास पुन्हा तशी परिस्थिती उद्भवणार नाही, याची खबरदारी पालिका घेत आहे. त्याकरिता पुरेसे बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध करून ठेवले आहेत.
शहरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे परिस्थिती हाताळण्यास प्रशासन सज्ज आहे. पुरेशा संख्येने आयसीयू, ऑक्सिजन, तसेच इतर बेड उपलब्ध आहेत, तसेच पालिखआ नवे ७५ आयसीयू बेड लवकरच उपलब्ध ङोणार आहेत. - संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका