शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

कोरोना नियंत्रणासाठी २५१ कोटींची मागणी; नवी मुंबई पालिकेला शासनाकडून मिळाले ११ कोटी ८८ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 07:07 IST

आतापर्यंत शासन व आमदार निधीतून मनपास ११ कोटी ८८ लाख रुपये मिळाले असून, जास्तीत जास्त निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोना नियंत्रणासाठी महानगरपालिकेच्या तिजोरीवरील ताण वाढू लागला आहे. मार्चपासून जवळपास १३७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. राज्य आपत्ती निवारण निधीतून २५१ कोटी रुपये मिळावे, असा प्रस्ताव महानगरपालिकेने शासनास दिला आहे. आतापर्यंत शासन व आमदार निधीतून मनपास ११ कोटी ८८ लाख रुपये मिळाले असून, जास्तीत जास्त निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.नवी मुंबईमध्ये १३ मार्चला पहिला रुग्ण सापडला. फिलिपाइन्सवरून आलेल्या व्यक्तीला कोरोना झाल्याचे निदर्शनास येताच, महानगरपालिकेने तत्काळ संपूर्ण लक्ष कोरोना नियंत्रण व उपाययोजनांवर केंद्रित केले. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाचे डेडिकेटेड कोविड रुग्णालयात रूपांतर करण्यात आले. रुग्णवाढीचा अंदाज लक्षात घेऊन वाढीव बेड्स, औषध खरेदी व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. शहरातील रुग्णसंख्या ३० हजार झाली असून, आतापर्यंत २६ हजार नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. साडेसहाशे नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. प्रतिदिन ३०० ते ४०० नवीन रुग्ण वाढत असून, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्रचंड खर्च करावा लागत आहे. महानगरपालिकेने मार्चपासून जवळपास १३७ कोटी रुपये खर्च केले आहेत. खर्चाचा आकडा प्रतिदिन वाढत चालला आहे.कोरोनामुळे पालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. मालमत्ता, पाणी व इतर करांतून येणारी रक्कम वेळेत मिळत नाही. खर्चाचा आकडा मात्र झपाट्याने वाढत आहे. महामारीशी मुकाबला करण्यासाठी शासनाकडूनही निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शासनाच्या आपत्ती निवारण विभागातून नवी मुंबई महानगरपालिकेस २५१ कोटी रुपये मिळावे, अशी मागणी महानगरपालिकेने केली आहे. त्यासाठी पाठपुरावाही सुरू केला आहे. आतापर्यंत शासनाने महानगरपालिकेला १० कोटी ४० लाख रुपये व १ कोटी ४४ लाख रुपये आमदान निधी मिळून ११ कोटी ८८ लाख रुपये मिळाले आहेत. याशिवाय शासनाकडून दहा अत्याधुनिक व्हेंटिलेटर्सही मिळाले आहेत.शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध झाल्यास मनपाच्या तिजोरीवरील भार काही प्रमाणात हलका होणार आहे. यामुळे प्रशासनानेही पाठपुरावा सुरू केला आहे. कोरोनाचे संकट अजून काही महिने सुरूच राहणार आहे.एमएमआर परिसरात १,२०० कोटी खर्चनवी मुंबईसह एमएमआर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या परिसरात पाच जिल्ह्यांमधील सर्व महानगरपालिका व काही नगरपालिकांचाही समावेश होतो. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईमध्ये राधास्वामी सत्संग भवनमधील कोरोना उपचार केंद्राचे उद्घाटन करताना या परिसरात आतापर्यंत १,२०० कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याची माहिती दिली आहे. या निधीमधून नवीन रुग्णालय उभारणी, औषध पुरवठा व इतर उपकरणांचा समावेश आहे.

आतापर्यंत केलेली कामे- वाशी सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १,२०० बेड्सचे विशेष रुग्णालय-तुर्भे राधास्वामी सत्संग भवनमध्ये ३५ हजार चौरस क्षेत्रफळावर ४११ आॅक्सिजन बेड्सचे रुग्णालय-नेरुळमधील मनपा रुग्णालयात प्रतिदिन १ हजार क्षमतेची आरटीपीसीआर लॅबची उभारणी- एपीएमसीमधील निर्यात भवनमध्ये ५१६ आॅक्सिजन बेड्स क्षमतेने रुग्णालय- सानपाडा एमजीएम रुग्णालयाच्या इमारतीत ७५ आॅक्सिजन बेड्स क्षमतेचे रुग्णालय- ऐरोली सेक्टर १५ मधील पाटीदार समाज भवनमध्ये ३०२ बेड्सचे कोविड केअर सेंटर- वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात १७५ बेड क्षमतेचे डेडिकेटेड कोविड रुग्णालयात रूपांतर- पनवेलमधील इंडिया बुल्स इमारतीमध्ये १,०८० बेड्सचे कोविड केअर सेंटरची उभारणी- कोपरखैरणे सेक्टर ५ मधील समाज मंदिरात ७० बेड्सची व्यवस्था- नेरुळमधील आगरी कोळी भवनमध्ये १०० बेड्सची केंद्र सुरू- ऐरोली सेक्टर ५ मधील समाज मंदिरात ७६ बेड्सचे केंद्र- नेरुळ सेक्टर ९ मधील केंद्रामध्ये ५५ बेड्सचे केंद्र- सीबीडी सेक्टर ३ मधील बहुउद्देशीय केंद्रात ९६ बेड्सची व्यवस्था- वाशी सेक्टर १४ मधील बहुउद्देशीय इमारतीमध्ये १०८ बेड्सची व्यवस्था- वाशीतील ईटीसी केंद्रांमध्ये महिलांसाठी १५० बेड्सचे केअर सेंटर- डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयाबरोबर २०० आयसीयू बेड्ससह ८० व्हेंटिलेटर्ससाठी करार

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई