शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

ऐरोलीतून २५ किलो कॅनाबिस ड्रग जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:23 PM

गोपनीय माहितीच्या आधारे रबाळे पोलिसांनी सापळा रचून २५ किलो कॅनाबिस ड्रग जप्त केले आहे.

नवी मुंबई : गोपनीय माहितीच्या आधारे रबाळे पोलिसांनी सापळा रचून २५ किलो कॅनाबिस ड्रग जप्त केले आहे. बाजारभावानुसार त्याची किंमत १ लाख २० हजार रुपये असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. संशयास्पद कारच्या झडतीवेळी कारमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आढळून आले.ऐरोली परिसरात एका कारमधून अमली पदार्थाची वाहतूक होणार असल्याची माहिती रबाळे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अजय कुंभार यांना मिळाली होती. त्यानुसार कुंभार यांच्या पथकाने परिसरात ठिकठिकाणी पाळत ठेवली होती. यादरम्यान खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे संशयित कारची झाडाझडती घेतली जात होती. त्यावेळी पोलिसांनी एम.एच.०५. बी.जे. ५०५१ क्रमांकाची कार अडवून त्याची झडती घेतली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रगचा साठा आढळून आला. चौकशीत ते कॅनाबिस ड्रग असून त्यावर बंदी असल्याचे समोर आले. त्यानुसार कारमधील २५ किलो वजनाचे कॅनाबिस पोलिसांनी जप्त केले असून कार चालकाला अटक केली आहे. त्याच्याविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याने हे ड्रग कुठून आणले याचा अधिक तपास सुरू असल्याचे सहायक आयुक्त प्रदीप जाधव यांनी सांगितले.