तलाव सुशोभीकरणासाठी अडीच कोटींचा खर्च

By Admin | Updated: June 24, 2016 03:51 IST2016-06-24T03:51:25+5:302016-06-24T03:51:25+5:30

रोडपाली परिसरातील गणेश विसर्जन तलावाची दुरवस्था झाली आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जलाशयाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे

2.5 crore expenditure for beautification of lake | तलाव सुशोभीकरणासाठी अडीच कोटींचा खर्च

तलाव सुशोभीकरणासाठी अडीच कोटींचा खर्च

अरुणकुमार मेहत्रे,  कळंबोली
रोडपाली परिसरातील गणेश विसर्जन तलावाची दुरवस्था झाली आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जलाशयाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. याकरिता २ कोटी ६७ लाखांचा खर्च येणार असल्याची माहिती सिडकोकडून देण्यात आली आहे. निविदा प्रक्रि या अंतिम टप्प्यात असून ते पूर्ण झाल्यानंतर त्वरित काम सुरू करण्यात येणार आहे.
रोडपाली ते पनवेल-सायन महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर हा जुना तलाव आहे. सिडकोने जमीन संपादित करण्याआधीपासूनहा तलाव या ठिकाणी आहे. याठिकाणी गणपती विसर्जन केले जाते. सिडकोने कळंबोली वसाहत विकसित केल्यानंतर हा तलाव दुर्लक्षित राहिला होता. त्यानंतर रोडपालीतील सेक्टर विकसित झाले तरी तलावाच्या स्वच्छता झाली नाही. याठिकाणी विरंगुळ्यासाठी एकही व्यवस्था नाही. त्यामुळे तलाव सुशोभित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सिडकोचे अधीक्षक अभियंता किरण फणसे यांनी प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला. या कामाची निविदा सुध्दा प्रसिध्द झाली असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले. दीड दोन महिन्यात प्रत्यक्षात काम सुरू होईल, असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: 2.5 crore expenditure for beautification of lake