शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

एपीएमसी फळ बाजारात २३ वर्षे करचोरीचा प्रयोग, चौकशी समितीच्या अहवालावर कार्यवाही नाही

By नामदेव मोरे | Updated: April 3, 2025 05:52 IST

Mumbai APMC: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये २००२ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर गेटवर थेट करवसुलीचा निर्णय घेण्यात आला. करचोरीलाच चालना मिळत असताना २३ वर्षांपासून हा प्रयोग सुरूच आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबईमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये २००२ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर गेटवर थेट करवसुलीचा निर्णय घेण्यात आला. करचोरीलाच चालना मिळत असताना २३ वर्षांपासून हा प्रयोग सुरूच आहे. समितीच्या चौकशी समितीने ही पद्धत चुकीची असल्याचा अहवाल वर्षभरापूर्वी दिला आहे. मात्र, यावर काहीच कार्यवाही झाली नसल्याने नवीन संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत आश्चर्य व्यक्त करून कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनास देण्यात आले.

बाजार समितीच्या भाजीपाला, कांदा, बटाटा व फळ मार्केटमध्ये विक्री झालेल्या मालावर व्यापाऱ्यांकडून करवसुली करण्याची पद्धत होती. परंतु, फळ मार्केटमधील व्यापाऱ्यांनी गेटवर खरेदीदारांकडून कर घेण्याची मागणी केली. यामुळे २००२ मध्ये गेटवर थेट कर वसुली सुरू झाली. काही वर्षांनी जावक गेटबरोबर आतमध्येही प्रत्येक विंगमध्ये करवसुलीसाठी केबीन तयार करण्यात आली. वाहतूकदार यामधील काही पावत्या लपवून कमी कराचा भरणा करू लागले. व्यापाऱ्यांनी कार्बन वापरून तीन पावत्या तयार करणे अपेक्षित असताना तसे केले जात नाही.

बाजार समितीमधील कर चोरीविरोधात ८ नोव्हेंबर २०२३ रोजी व्यापाऱ्यांनीच आवाज उठविला. गेटवर दोन टेम्पो पकडून दिले. या दोन्ही टेम्पोमधील फळांसाठी भरलेला कर व आतमध्ये असलेला माल यामध्ये तफावत आढळली. करचोरी उघडकीस आल्यामुळे यावर निर्णय घेण्यासाठी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीच्या अहवालावर अद्याप काहीच निर्णय घेतला नाही. 

पाचपट करचोरी उघडनोव्हेंबर २०२३मध्ये व्यापाऱ्यांनी एक टेम्पो अडविला. त्यामध्ये पावतीनुसार ६० हजार रुपये किमतीची फळे होती. त्याचा कर ६०० रुपये दाखविला होता. प्रत्यक्षात सर्व फळे खाली केल्यानंतर आतमध्ये ३ लाख ४२ हजार ८०० रुपयांची फळे असल्याचे निदर्शनास आले. त्याचा कर ३,४२८ एवढा होता. प्रशासनाने कर चुकविणाऱ्यांवर तिप्पट दंड लावून ११ हजार ३१२ रुपये वसूल केले. पाचपट कर चोरी झाल्याचे निदर्शनास आले होते. दुसऱ्या टेम्पोमध्ये ३३ हजार रुपयांचा माल असल्याचे दाखविले. पण, १ लाख ६१ हजार रुपयांचा माल आढळला. त्याचा कर १,६१६ रुपये झाला. 

हा विषय चर्चेला आणलागेले वर्षभर संचालक मंडळ अस्थिर असल्याने बैठका होत नव्हत्या. त्यामुळे अहवालावर कार्यवाही प्रलंबित होती. परंतु आता नव्या अध्यक्षांनी हा विषय चर्चेला आणला आहे. 

फळ मार्केटमध्ये करसंकलन सुधारण्यासाठीच्या समितीच्या अहवालावर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. ४ एप्रिलला व्यापाऱ्यांबरोबर बैठक घेतली जाणार आहे. करवाढ करण्याविषयी ठोस निर्णय घेतला जाणार असून, उत्पन्न वाढीसाठी इतरही निर्णय घेतले जाणार आहेत. - पी. एल. खंडागळे, सचिव, बाजार समिती

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMumbaiमुंबई