विमानतळबाधितांसाठी २२.५ टक्के भूखंडांची सोडत

By Admin | Updated: October 25, 2016 04:16 IST2016-10-25T04:16:57+5:302016-10-25T04:16:57+5:30

आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सिडकोच्या माध्यमातून २२.५ टक्के भूखंडांचे वाटप करण्यात येते. तसेच या प्रकल्पामुळे

22.5 percent lease of land for airport boundaries | विमानतळबाधितांसाठी २२.५ टक्के भूखंडांची सोडत

विमानतळबाधितांसाठी २२.५ टक्के भूखंडांची सोडत

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सिडकोच्या माध्यमातून २२.५ टक्के भूखंडांचे वाटप करण्यात येते. तसेच या प्रकल्पामुळे स्थलांतरित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन आणि पुन:स्थापना योजनेअंतर्गत भूखंडांचे वाटप केले जाते. सोमवारी संगणकीय सोडत काढून या योजनेअंतर्गत भूखंडांचे वाटप करण्यात आले.
नवी मुंबई विमानतळासाठी एकूण २२६८ हेक्टर जमिनीची गरज आहे. त्यापैकी १५९७ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात सिडकोला यश आले आहे. उर्वरित ६७१ हेक्टर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सिडकोच्या माध्यमातून प्रस्तावित पुष्पकनगरमध्ये २२.५ टक्के भूखंडांचे वाटप करण्यात येते. याअंतर्गत ७0 प्रकल्पग्रस्तांना भूखंडांचे वाटप करण्यात आले. तर पुनर्वसन आणि पुन:स्थापना योजनेअंतर्गत १९२ प्रकल्पग्रस्तांना भूखंडांचे वाटप करण्यात आले. पुनर्वसन व पुन:स्थापना योजनेअंतर्गत पात्र प्रकल्पग्रस्तांसाठी वडघर (चिंचपाडा) येथे भूखंड विकसित करण्यात आले आहेत. दरम्यान, यापूर्वी या योजनेअंतर्गत आठ सोडत काढण्यात आल्या आहेत. अत्यंत पारदर्शक पध्दतीने झालेल्या या सोडत प्रक्रियेला सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा, निवृत्त न्यायाधीश एम.एन. कुलकर्णी, जी.एम.जेड्डी, सिडकोच्या माजी समाजसेवा अधिकारी रिमा दीक्षित आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 22.5 percent lease of land for airport boundaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.