शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

नवी मुंबई क्षेत्रातील १५६ गुन्हेगार हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:09 IST

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई : भुरट्या चोरांसह गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा समावेश

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून १५६ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. त्यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न व चोरीसह इतर गुन्ह्यांमधील आरोपींचा समावेश आहे. तर मागील दीड वर्षात नवी मुंबईतून तब्बल १५६ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान दहशत पसरवली जाऊ नये, याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. त्यानुसार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ एक मधून २४ तर परिमंडळ दोनमधून १९ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. परिमंडळ एकचे उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे व परिमंडळ दोनचे उपआयुक्त अशोक दुधे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिनियम कलम ५६ व ५७ अंतर्गत या कारवाया झाल्या आहेत. त्यामध्ये मारामारी, वाहनचोरी, हत्या तसेच हत्येचा प्रयत्न, घरफोडी यासह सोनसाखळी व मनाई आदेशाचे उल्लंघन अशा गुन्ह्यातील गुन्हेगारांचा समावेश आहे. त्यांना मुंबई, मुंबई उपनगर यासह ठाणे व रायगड या महसूल जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या गुन्हेगारांना पुढील दोन वर्षांसाठी सदर महसूल क्षेत्रात प्रवेशबंदी असणार आहे. यामुळे निवडणूक कालावधीची प्रक्रिया शांततेत पार पडेल असा पोलिसांचा विश्वास आहे.

मतदारांवर दहशत पसरवण्यासाठी अथवा ठरावीक उमेदवाराचा प्रभाव वाढवण्यासाठी गुन्हेगारांचा वापर केला जाण्याचीदाट शक्यता असते, त्यामुळे आचारसंहिता घोषित झाल्यापासून पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवायांवर भर दिला जात आहे.

त्यानुसार अवैधरीत्या शस्त्र बाळगणारे, गावठी दारूविक्रेते त्याशिवाय बेहिशोबी रक्कम सोबत बाळगणारे अशांवरही कारवाया केल्या जात आहेत. तर शहरात राहण्यास असलेल्या व विविध गुन्ह्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या गुन्हेगारांवर पाळत ठेवून त्यांना हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईनंतर शहरात त्यांना येण्यास मज्जाव असतानाही एखाद्या गुन्हेगाराने आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यास अटकाव घातला जात आहे. मागील काही दिवसांत अशा प्रकारच्याही कारवाया करण्यात आल्या आहेत. यामुळे नवी मुंबईकरांनी सुटकेचा श्वास घेतला असून, अद्यापपर्यंत शहरात कोणताही गैरप्रकार घडलेला नाही.

नवी मुंबईकरांना गुन्हेगारांच्या दहशतीमधून मुक्त करण्याच्या उद्देशाने पोलिसांकडून मागील तीन वर्षांपासून हद्दपारीच्या कारवायांमध्ये सातत्य ठेवले जात आहे. त्यानुसार तीन वर्षांत तब्बल १५६ गुन्हेगारांना तडीपार केले आहे. त्यामध्ये परिमंडळ एक मधील ९९ तर परिमंडळ दोन मधील ५७ गुन्हेगारांचा समावेश आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी