शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

१४ हजार इमारतींना भोगवटा प्रमाणपत्रच नाही; दहा हजारांपेक्षा जास्त अनधिकृत बांधकामे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 11:43 PM

नवी मुंबईत सिडकोसह महानगरपालिकेचे दुर्लक्ष

नामदेव मोरेनवी मुंबई : महाडमधील इमारत दुर्घटनेनंतर राज्यभरातील इमारतींच्या बांधकामांचा व अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुनियोजित शहर असलेल्या नवी मुंबईमध्येही दहा हजारपेक्षा जास्त अनधिकृत बांधकामे आहेत. तर, तब्बल १४ हजारपेक्षा जास्त इमारतींना भोगवटा प्रमाणपत्रच नाही. सिडको व महानगरपालिकेचे अधिकारीही अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करीत असून एखादी इमारत कोसळली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

देशातील राहण्यायोग्य शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश केला जातो. महापालिकेने स्वच्छ भारत अभियानामध्येही देशात तिसरा क्रमांक मिळविला आहे. परंतु महापालिका, सिडको व एमआयडीसी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मागील काही वर्षांमध्ये अनधिकृत बांधकामांची संख्या वाढत आहे. सद्य:स्थितीमध्ये दहा हजारपेक्षा जास्त ठिकाणी अनधिकृत बांधकामे आहेत. काही ठिकाणी संपूर्ण इमारत बेकायदेशीर तर, काही ठिकाणी इमारतीमध्ये अतिक्रमण केलेले आहे. सिडकोसह, एमआयडीसीचे शेकडो भूखंड गिळंकृत केले आहेत. अनधिकृत बांधकामांविरोधात सातत्याने व ठोस कारवाई होत नसल्यामुळे अतिक्रमणांचा आकडा वाढत आहे. तर, बैठ्या चाळींमधील घरांची पुनर्बांधणी करताना अतिक्रमण होत आहे. १० वर्षांमध्ये या चाळींमधील घरांसाठी बांधकाम परवानगी घेतलेल्या ९० टक्के नागरिकांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतले नाही. दोन वर्षांपासून पालिकेने परवानगी दिलेली नसतानाही बिनधास्त अनधिकृत वाढीव बांधकाम केले जात आहे.

कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, नेरूळ, ऐरोली परिसरामध्ये बैठ्या चाळींच्या जागेवर ३ ते ५ मजल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. माथाडी वसाहतींना व अल्प उत्पन्न गटातील घरांच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाले आहे. याशिवाय सिडकोच्या भूखंडांवरही परवानगी न घेता इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. एक मजल्याची परवानगी घेऊन प्रत्यक्षात चार मजल्यांचे बांधकाम केले आहे. यामुळे भविष्यात ही बांधकामे कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता आहे.कारवाई केलेल्या जागेवर पुन्हा इमारतीमागील १० वर्षांमध्ये नेरूळ, सानपाडा, वाशी नोड ते ऐरोलीदरम्यान अनेक इमारतींवर अर्धवट कारवाई केली गेली. या वेळी इमारतीच्या स्लॅबला होल पाडणे, पिलर्स जेसीबीने हलवून अतिक्रमण कारवाई झाल्याचा दिखावा केला जातो. अर्धवट बांधकाम पाडलेल्या ठिकाणी काही दिवसांमध्ये पुन्हा इमारतींचे बांधकाम केले आहे.अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई नाहीमहानगरपालिका व सिडकोचे अधिकारी संबंधितांना नोटीस देतात. काही ठिकाणी कारवाई केल्याचे भासविले जाते. परंतु प्रत्यक्षात अतिक्रमण पूर्णपणे पाडलेही जात नाही व थांबविलेही जात नाही. अतिक्रमण प्रकरणी त्या विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईची तरतूद आहे. परंतु कारवाई करण्यात आलेली नाही.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाcidcoसिडको