गोरेगावमध्ये १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: May 29, 2017 04:37 IST2017-05-29T04:37:52+5:302017-05-29T04:37:52+5:30
माणगाव तालुक्यातील आंबले गावातील ६७ गुंठे जमिनीचे बोगस सातबारा उतारे तयार करून, ते माणगाव येथील दुय्यम निबंधक

गोरेगावमध्ये १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
विशेष प्रतिनिधी/लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : माणगाव तालुक्यातील आंबले गावातील ६७ गुंठे जमिनीचे बोगस सातबारा उतारे तयार करून, ते माणगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस खरेदीखत दस्त सादर करून, हाळ बुद्रुक गावातील महिलेस ही जमीन विक्री करून, त्या महिलेची ८५
हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकूण पाच आरोपींविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पी. व्ही. पाटील करीत आहेत.
दुसऱ्या एका प्रकरणात तोतया मालक व संबंधित माणसे उभी करून, खोटे बनावट कागदपत्र तयार करून संगनमताने माणगाव तालुक्यातील आंबले गावातील जमिनीचे खोटे खरेदीखत करून, ७ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकूण आठ आरोपींविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास हवालदार एस.एस. चव्हाण करीत आहेत.