शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

विकासासाठी ४०० कोटींचा प्रस्ताव- राधाकृष्ण विखे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 11:51 PM

पनवेलमध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन

पनवेल : पनवेल शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी महापालिकेने चारशे कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. येत्या आठ दिवसांत याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन त्याच्या डीपीआरला लगेचच मान्यता देऊ, तसेच ही घरे बांधताना नवीन तंत्रज्ञान वापरून कमी वेळेत ती उभी करू, अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी केली. सिडको अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख म्हणून उपस्थित होते.ठाकूर यांच्या ४५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खांदा वसाहती येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर आयोजित करण्यात आले होते. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महाशिबिराच्या उद्घाटन झाले. यावेळी विखे पाटील यांनी, तब्बल १२ वर्षे महाआरोग्य शिबिर घेण्याबाबत ठाकूर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. सभागृहात काही मोजकेच सदस्य अभ्यासपूर्ण पध्दतीने विषयाची प्रभावी मांडणी करतात. त्यामध्ये आ. प्रशांत ठाकूर यांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.शिबिरास कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, प्रवक्ते वाय. टी. देशमुख, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, माजी सभापती मनोहर म्हात्रे, आरपीआयचे नेते नगरसेवक जगदिश गायकवाड, डॉ. गिरीश गुणे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.पावसामुळे अनेकांना शिबिराला येता आले नाही. त्यामुळे गरज पडल्यास पुन्हा शिबिर घेऊ असे यावेळी माजी खा. रामशेठ ठाकूर यांनी जाहीर केले. जोरदार पाऊस कोसळत असल्याने आरोग्य महाशिबिराचे काय होणार याची चिंता होती, पण राधाकृष्ण विखे-पाटील वेळेत आल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील