शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘विचार सोडला, वारसा सोडला, कार्यकर्ते गेले, मते गेली, उरलं काय?’, जिल्हा परिषद निकालांतर भाजपाचा उद्धवसेनेला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 13:07 IST

ZP Election Result 2026: काल लागलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांमघ्ये भाजपाने स्वबळावर आणि मित्रपक्षांसोबत मिळून बहुतांश जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये सत्ता मिळवली आहे. या दणदणीत विजयानंतर भाजपाने आपला पूर्वाश्रमीचा मित्रपक्ष आणि सध्याचा राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या उद्धवसेनेला चिमटा काढला आहे.

सोमवारी लागलेल्या राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपाने स्वबळावर आणि मित्रपक्षांसोबत मिळून बहुतांश जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये सत्ता मिळवली आहे. या दणदणीत विजयानंतर भाजपाने आपला पूर्वाश्रमीचा मित्रपक्ष आणि सध्याचा राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या उद्धवसेनेला चिमटा काढला आहे. ‘विचार सोडला, वारसा सोडला, कार्यकर्ते गेले, मते गेली, उरलं काय? फक्त पानिपट’ असा टोला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. 

जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत उद्धवसेनेनेला डिवचले. या पोस्टमध्ये उपाध्ये यांनी लिहिलं की, बाळासाहेबांनी जे कमावले, ते उद्धव ठाकरेंनी गमावले आहे. कधीकाळी केंद्रात मंत्रिपदे, राज्यात मंत्रिपदे, मुंबई-ठाण्यासारख्या महापालिकांमध्ये सत्ता आणि महापौरपदाचा मान, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समित्यांचे कारभारी अशी  उद्धवसेनेची राजकीय भरभराट सर्वदूर पसरलेली होती. पण आजचं वास्तव मात्र वेगळंच आहे.

आज उद्धवसेनेकडे ना केंद्रात मंत्रिपद आहे, ना विधान परिषदेत स्वत: परत निवडून येण्याइतकी आमदारांची ताकद आहे. उद्धवसेनेकडून महानगरपालिका गेल्या, सत्ता गेली. जिल्हा परिषदांमध्ये तर अक्षरशः  धुव्वा उडाला आहे. एकाही जिल्हा परिषदेत दोन आकडी संख्या गाठता आली नाही. राज्यभरातील जिल्हा परिषद सदस्यांचा आकडा ५० ही पार करू शकला नाही. उद्धवसेनेने विचार सोडला, वारसा सोडला. त्यांचे कार्यकर्ते  गेले आणि मतेही गेली. आता उरलं काय? तर फक्त पानिपत, असा टोला केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.  

English
हिंदी सारांश
Web Title : BJP taunts Uddhav Sena after Zilla Parishad results: What remains?

Web Summary : BJP mocks Uddhav Sena's losses after Zilla Parishad elections. BJP's Keshav Upadhye says Uddhav Thackeray lost ideology, legacy, workers, and votes, resulting in political downfall.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना