Zohran Mamdani Umar Khalid : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे नवे महापौर जोहरान ममदानी यांनी तिहार तुरुंगात कैद असलेल्या माजी जेएनयू विद्यार्थी उमर खालिद याच्या समर्थनार्थ पत्र लिहिल्याने भारताच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. यासोबतच काही अमेरिकी खासदारांनीही भारत सरकारला पत्र लिहिल्याने भारतीय जनता पक्षाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर तीव्र टीका केली आहे.
भाजपने यामागे ‘भारतविरोधी लॉबी’ सक्रिय असल्याचा आरोप करत, परदेशात भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले आहे.
भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांचा आरोप
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत राहुल गांधींवर थेट निशाणा साधला. राहुल गांधींचा फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिले, राहुल गांधी भारतविरोधी लॉबी कशी काम करते? 2024: अमेरिकेत राहुल गांधी यांची खासदार शाकोव्स्की यांच्याशी भेट होते आणि त्याचवेळी भारतविरोधी वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या इल्हान उमरही उपस्थित असतात.
जानेवारी 2025: शाकोव्स्की ‘आंतरराष्ट्रीय इस्लामोफोबियाविरोधी कायदा’ मांडतात, ज्यात भारताचा स्पष्ट उल्लेख आहे. कट टू 2026: त्या शाकोव्स्की भारत सरकारला पत्र लिहून दंगली आणि हिंसाचाराशी संबंधित प्रकरणात UAPA अंतर्गत आरोपी असलेल्या उमर खालिदबाबत चिंता व्यक्त करतात. भारतविरोधी शक्ती राहुल गांधींच्याच भोवती का गोळा होतात? असा सवाल भंडारी यांनी विचारला.
'तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही', जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा
भंडारी पुढे लिहितात, जेव्हा जेव्हा परदेशात भारतविरोधी वक्तव्ये किंवा मोहीम राबवली जाते, तेव्हा पार्श्वभूमीवर एकच नाव पुन्हा पुन्हा पुढे येते आणि ते म्हणजे राहुल गांधी. भारताला कमकुवत करू पाहणारे, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला बदनाम करू इच्छिणारे आणि भारताचे दहशतवादविरोधी कायदे कमजोर करण्याचा प्रयत्न करणारे लोक शेवटी त्यांच्याच आसपास एकत्र येतात, असा आरोप त्यांनी केला.
महापौर ममदानींचे पत्र
न्यूयॉर्क शहराचे नवे महापौर जोहरान ममदानी यांनी तिहार तुरुंगात असलेल्या उमर खालिद यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर त्याच दिवशी प्रसिद्ध झाले, ज्या दिवशी ममदानी यांनी महापौरपदाची शपथ घेतल्याचे सांगितले जाते. या पत्रात ममदानी यांनी उमर खालिद आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याचा उल्लेख करत, त्यांच्या दीर्घकालीन कारावासाबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच, या प्रकरणाकडे मानवाधिकारांच्या दृष्टीने पाहावे, अशी सूचक भूमिका त्यांनी मांडल्याचे सांगितले जात आहे.
'आम्ही तुझ्याबद्दल विचार करतो..', न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचे उमर खालिदला पत्र
Web Summary : BJP accuses Rahul Gandhi of aligning with an anti-India lobby after US officials expressed concern for Umar Khalid's imprisonment. They allege foreign interference in India's internal affairs.
Web Summary : भाजपा ने उमर खालिद की कैद पर अमेरिकी अधिकारियों द्वारा चिंता व्यक्त करने के बाद राहुल गांधी पर भारत विरोधी लॉबी के साथ गठबंधन करने का आरोप लगाया। उन्होंने भारत के आंतरिक मामलों में विदेशी हस्तक्षेप का आरोप लगाया।