सत्तेसाठी जुळवाजुळव सुरू जिल्हा परिषद कर्मचारी संस्था : १२ ला माघार, खलबते, बैठकांना ऊत
By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:16+5:302015-03-06T23:07:16+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषद कर्मचार्यांसाठी प्रतिष्ठेच्या असणार्या कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्तेसाठी जुळवाजुळव सुरू आहे. या ठिकाणी सत्ताधारी पावन गणेश मंडळाने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विद्यमान संचालक, इच्छुकांसोबत सत्तेसाठी बोलणी सुरू केली आहे. पुढील आठवड्यात १२ तारखेला माघारीची मुदत असल्याने तोपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

सत्तेसाठी जुळवाजुळव सुरू जिल्हा परिषद कर्मचारी संस्था : १२ ला माघार, खलबते, बैठकांना ऊत
अ मदनगर : जिल्हा परिषद कर्मचार्यांसाठी प्रतिष्ठेच्या असणार्या कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्तेसाठी जुळवाजुळव सुरू आहे. या ठिकाणी सत्ताधारी पावन गणेश मंडळाने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विद्यमान संचालक, इच्छुकांसोबत सत्तेसाठी बोलणी सुरू केली आहे. पुढील आठवड्यात १२ तारखेला माघारीची मुदत असल्याने तोपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येत्या २८ तारखेला मतदान होणार आहे. दोन पंचवार्षिकपासून या ठिकाणी पावन गणेश मंडळाचे वर्चस्व आहे. यंदा संस्थेच्या दोन कोटी रुपयांच्या इमारतीचे काम सुरू आहे. यामुळे यंदा निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सामान्य सभासदांची मागणी आहे. या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाल्यास त्याचा फायदा सभासदांना होणार आहे. संस्थेचे लाखो रुपये आणि कर्मचार्यांतील संघर्ष टाळता येणार आहे. यासाठी सत्ताधारी आणि विरोधी गटातील प्रमुखांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, घोडे हे जागावाटपावर अडले आहे. या संस्थेत २ हजार ८४८ सभासद आहेत. यात सर्वाधिक आरोग्य संवर्गातील, त्या खालोखाल शिपाई आणि लिपिक संवर्गातील कर्मचार्यांचा समावेश आहे. उर्वरितमध्ये पशूधन पर्यवेक्षक, तांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक या संवर्गातील कर्मचार्यांचा समावेश आहे. या सर्व संवर्गातील नेते आपआपल्या मध्यस्थांमार्फत सत्ताधार्यांसोबत वाटाघाटीत गुंतले आहेत. मुख्यालयातील दोन जागा आणि अन्य तालुक्यांच्या काही जागांवर बोलणी अडली असून रविवारपर्यंत यातून मार्ग निघेल, असा विश्वास सत्ताधारी गटाला आहे. सध्या संस्थेच्या अद्ययावत दोन कोटी रुपयांच्या इमारतीचे काम सुरू आहे. तसेच संस्थेचे कामकाज ऑनलाईन करण्यात येत असल्याची माहिती संस्थेच्या प्रशासन विभागाकडून देण्यात आली. गुरूवारी माघारीच्या दिवशी निवडणुकीचे चित्र समोर येणार आहे...................संस्थेच्या हितासाठी सर्वांना सोबत घेवून संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आहे. सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी सर्वांसोबत चर्चा सुरू आहे. माघारीपर्यंत चित्र स्पष्ट होईल. संस्थेचा आणि सभासदांचा विचार करून सर्व इच्छुक सहकार्य करतील. - सुभाष कराळे, पावन गणेश मंडळ.......................सोसायटी निवडणुकीत नवीन सभासदांना संचालकपदाची संधी मिळणे आवश्यक आहे. मात्र, सत्ताधारी त्याच त्या चेहर्यांना समोर आणत आहेत. ही बाब तरूण, नवीन सभासदांना रुचणार नाही. याचा विचार सत्ताधार्यांनी करणे आवश्यक आहे. - शशिकांत रासकर, जि.प. कर्मचारी युनियन, सचिव....................