आमदारांविरुद्ध झिको मैदानात!

By Admin | Updated: July 8, 2015 23:45 IST2015-07-08T23:45:11+5:302015-07-08T23:45:11+5:30

प्रदर्शनीय सामन्यात एफसी गोवाचा विजय

Zico grounds against MLAs! | आमदारांविरुद्ध झिको मैदानात!

आमदारांविरुद्ध झिको मैदानात!

रदर्शनीय सामन्यात एफसी गोवाचा विजय
मडगाव : एफसी गोवा आणि गोवा पॉलिटिक्स इलेव्हन या प्रदर्शनीय सामन्यात गोव्यातील राजकारण्यांविरुद्ध ब्राझीलचा महान खेळाडू झिको मैदानात उतरला. घोगळ येथील चौगुले महाविद्यालयाच्या मैदानावरील सामन्यात अपेक्षितपणे बाजी मारली ती एफसी गोवानेच. मात्र, या सामन्याने अनेकांचे मनोरंजन केले.
पॉलिटिक्स इलेव्हन संघात वेळ्ळीचे आमदार बेंजामीन सिल्वा, बाणावलीचे आमदार क ायतू सिल्वा, पणजीचे आमदार सिध्दार्थ कुंकळयेकर व नावेलीचे आमदार तथा मंत्री आवेर्तान फुर्तादो यांचा समावेश होता, तर एफ सी गोवाच्या संघात एफसी गोवा संघाचे सहमालक दत्तराज साळगावकर, एफसी गोवा संघाचे प्रशिक्षक झिको तसेच या संघाचे व्यवस्थापन कर्मचारी वर्ग तसेच संघाच्या खेळाडूंचा सहभाग होता. सामन्यात एफसी गोवाने ९-७ ने बाजी मारली. यात दोन गोल झिको यांनी नोंदवले. पहिल्या टप्प्याच्या स्पर्धेत गोवा एफसी संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

Web Title: Zico grounds against MLAs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.